Team India Celebration: झाडावर चढलेल्या चाहत्याला पाहून रोहित शर्मा अन् विराट कोहलीने काय केलं?; व्हिडीओची तुफान चर्चा
Team India Celebration: मुंबई दाखल होताच टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
Team India Celebration: विश्वचषकाचा राजा कोण? टीम इंडिया...मुंबईचा राजा रोहित शर्मा, इंडिया, इंडिया...अशा घोषणांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमबाहेर मरिन ड्राइव्हचा परिसर दणाणला होता. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्हवर चाहत्यांचा जनसागर लोटला होता. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी सर्व चाहते दुपारपासून वाट पाहत होते.
मुंबई दाखल होताच टीम इंडियाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते टीम इंडियाच्या स्वागतासाठी दाखल झाले होते. मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडिअमपर्यंत भारतीय संघाची ओपन बसमध्ये विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी लाखो चाहते दाखल झाले होते.
आपल्या खेळाडूंना बघता यावं यासाठी चाहते प्रयत्न करत होते. याचदरम्यान एक चाहता चक्क झाडावर चढला होता. या चाहत्याला पाहून विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजालाही आर्श्चयाचा धक्का बसला. यावेळी रोहित शर्माने झाडावर चढलेल्या चाहत्याला खाली उतरण्याचा इशारा केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Cheeku asking hittu to see the fan who climbed up the tree😭😭❤ pic.twitter.com/CYWYZgelSW
— 2nd Icc Trophy win when Rohit (@49thTonWhenRo) July 4, 2024
A fan was already climbing on the tree. 😹😹😹 pic.twitter.com/JfPhV1ldYk
— زماں (@Delhiite_) July 4, 2024
बार्बाडोस ते दिल्ली आणि मुंबई...
तत्पूर्वी गुरुवारी सकाळी 6 वाजता भारतीय खेळाडू बार्बाडोसहून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि इतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याचवेळी गुरुवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईत भारतीय खेळाडूंची विजयी यात्रा सुरू झाली. या परेडमध्ये लाखो लोक रस्त्यावर आले होते. टीम इंडियाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. अशा प्रकारे भारतीय संघ दुसऱ्यांदा टू-20 विश्वचषक विजेता ठरला. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी-20 विश्वचषक जिंकला होता.
'तो' क्षण कधीच विसरणार नाही- विराट कोहली
वानखेडे स्टेडियममध्ये स्वागत समारंभात विराट कोहलीने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अखेरचं पाच षटकं महत्वाची ठरली. जसप्रीत बुमराह हा या पिढीतील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यानं आपल्याला सामन्यात पुन्हा-पुन्हा आणले. त्याची गोलंदाजी सर्वोत्तम झाली. उपस्थित असणाऱ्या चाहत्यांकडूनही टाळ्या वाजवून घेतल्या. आज जे पाहिले ते विसरता येणार नाही, असे विराट म्हणाला. विश्वचषकाइतकाच आजचा क्षण माझ्यासाठी खास होता. यावेळी विराट कोहली वानखेडे स्टेडिअमवर प्रतिक्रिया मांडताना म्हणाला की, विश्वचषक जिंकल्यावेळी 15 वर्षांत पहिल्यांचा रोहितला इतकं भावूक झालेलं बघितलं. इतरांसाठी कोणता क्षण खास होता माहित नाही. पण, विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित रडत होता, मीही रडत होतो आणि आम्ही हुंदके देत एकमेकांना पायऱ्यांवर मिठी मारली. तो क्षण मी कधीच विसरु शकणार नाही. तो क्षण अविस्मरणीय राहिलं, असंही कोहलीने म्हटलं.
संबंधित बातम्या:
घरी गेल्यानंतर हार्दिक पांड्याने मेडल कोणाला दिले?; अखेर फोटो आला समोर, सोशल मीडियावर कमेंटचा पाऊस