(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MS Dhoni On Sachin Tendulkar: 'मला सचिनसारखं खेळायचं होतं, पण नंतर समजलं...' धोनीचा व्हिडिओ व्हायरल
MS Dhoni On Sachin Tendulkar: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2022 रोजी आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं.
MS Dhoni On Sachin Tendulkar: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2022 रोजी आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं. त्याच्या निवृत्तीला दोन वर्ष उलटून गेली. मात्र, तरीही धोनीच्या फॅन फॉलोइंगमध्ये किंचीतही कमतरता जाणवली नाही. भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीची गणना केली जाते. धोनीच्या नेतृत्वात भारतानं आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. याच दरम्यान, धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे, ज्यात धोनीनं भारताचा माजी स्टार फलंदाज सचिन तेंडुलकरबाबत (Sachin Tendulkar) भाष्य केलंय.
धोनीनं काय म्हटलंय?
आयपीएल फ्रचांयझी चेन्नई सुपरकिंग्जनं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून धोनीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ एका शाळेतील कार्यक्रमातील असून धोनी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतोय. त्यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना धोनीनं सचिन तेंडुलकरला त्याचा आदर्श असल्याचं म्हटलंय. "सचिन तेंडुलकर माझ्यासाठी क्रिकेटचा आदर्श आहे. प्रत्येक भारतीयाप्रमाणे, जेव्हाही मी सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहायचो, तेव्हा मला त्याच्यासारखंच खेळायचं होतं. मात्र, नंतर मला समजलं की, मी त्याच्यासारखा खेळू शकत नाही. तरीही, माझ्या मनात नेहमी तेच होतं. मी नेहमीच त्याच्यासारखं खेळण्याचं स्वप्न पाहायचो", असं धोनी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.
सर्वात यशस्वी कर्णधार
आयसीसीच्या सर्व प्रमुख ट्रॉफी (एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा महेंद्रसिंह धोनी पहिला एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतानं 2007 मध्ये पहिल्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं. त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून क्रिकेटविश्वात भारताचा झेंडा फडकवला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं आणखी एक पराक्रम केलाय. 2013 च्या आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला.
व्हिडिओ-
Even Thala’s favourite period is PT! 😉#WhistlePodu #Yellove 🦁💛 @msdhoni pic.twitter.com/t4MInuQhxu
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 13, 2022
महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक झळकावली आहेत. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 10 हजार 773 धावांची नोंद आहे. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीनं 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्यानं एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिग्जच्या संघानं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकलीय.
हे देखील वाचा-