CWG 2022: कर्णधार हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचं लक्ष्य
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिल्याच क्रिकेट सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (IND W vs AUS W) आमने सामने आले आहेत.
![CWG 2022: कर्णधार हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचं लक्ष्य URL IND-W vs AUS-W T20 Commonwealth Games 2022 India Sets Target of 155 For Australia In CWG Birmingham CWG 2022: कर्णधार हरमनप्रीतची एकाकी झुंज, भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचं लक्ष्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/aa65fd5b35b6d0aa4fcf2e95b861fcb61659095502_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिल्याच क्रिकेट सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (IND W vs AUS W) आमने सामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची गोलंदाज जेस जोनासेनं (Jess Jonassen) भेदक माऱ्यापुढं भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातलं. कर्णधार हरमनप्रीत कौरचं (Harmanpreet Kaur) अर्धशतक आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचं लक्ष्य ठेवलंय. ऑस्ट्रेलियाची गोलंदाज जेस जोनासेनं (Jess Jonassen) भेदक माऱ्यापुढं भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातलं. दरम्यान, ऑस्ट्रेलियासमोर ठेवलेलं 155 धावांचं लक्ष्य रोखण्यासाठी भारतीय महिला संघ कशी कामगिरी बजावतोय? हे सामन्याच्या शेवटी स्पष्ट होईल.
कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिल्या क्रिकेट सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीवीर स्मृती मानधना (17 चेंडू 24 धावा) आणि शेफाली वर्मानं (33 चेंडूत 48) भारताला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर स्मृती मानधना बाद झाली. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेली यस्तीका भाटीया रन आऊट होऊन स्वस्तात माघारी परतली. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौरनं शेफाली वर्माला सोबत घेऊन संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पंरतु, मेगन शुटच्या गोलंदाजीवर शेफाली शर्माही बाद झाली. फक्त दोन धावांनी तिचं अर्धशतक हुकलं. हरमनप्रीत कौर आणि शेफाली वर्मा व्यतिरिक्त भारताच्या एकाही खेळाडूला काही खास कामगिरी करता आली नाही. जेमिमाह रॉड्रिग्स (11 धावा), दिप्ती शर्मा (1 धाव), हरलीन देओल (7 धावा), राधा यादव (नाबाद 2 धावा) आणि मेघना सिंह शून्यावर धावा केल्या. दरम्यान, भारतानं 20 षटकात 8 विकेट्स 154 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासेनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मेगन शुटनं दोन आणि डार्सी ब्राउननं एक विकेट घेतली.
भारताचा प्लेईंग इलेव्हन:
स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकिपर), जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका सिंह.
ऑस्ट्रेलियाचा प्लेईंग इलेव्हन:
अॅलिसा हिली (विकेटकिपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)