ICC WTC Points Table : 'या' चार कसोटी मालिका ठरवणार कोण खेळणार अंतिम सामना? जाणून घ्या कशी आहे गुणतालिका?
World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या गुणतालिकेत सध्या टॉप-2 वर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आहेत.
WTC 2021-23 Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (World Test Championship 2023) च्या अंतिम सामन्याला आता जवळपास 8 महिने शिल्लक आहेत. या 8 महिन्यांत WTC चॅम्पियनशिपमधील अनेक कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ज्यातील चार कसोटी सामने हे WTC चे फायनलिस्ट अर्थात अंतिम सामना खेळणारे दोन संघ कोण हे ठरवण्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. तर या मालिका कोणत्या आणि त्यांचा कसा परिणाम WTC गुणतालिकेवर होईल हे पाहूया...
1. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघात तीन कसोटी सामन्यंची मालिका 17 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे. WTC गुणतालिकेत दक्षिण आफ्रिका सध्या अव्वल स्थानी असून इंग्लंडचा संघ सातव्या नंबरवर आहे. दक्षिण आफ्रिका जर ही मालिका जिंकेल तर अंतिम सामन्यात खेळणाऱ्या दोन संघातील एक संघ म्हणून जवळपास निश्चित होईल. पण इंग्लंडचा संघ सध्या कमाल फॉर्ममध्ये असल्याने दक्षिण आफ्रिकेचं जिंकणं अवघड आहे.
2. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात डिसेंबर 2022 मध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडचा संघ सध्या दमदार फॉर्मात असला तरी मालिका पाकिस्तानात असल्याने त्यांच्याच भूमीत त्यांना मात देणं अवघड आहे. जर इंग्लंडला WTC गुणतालिकेत टिकून राहायचं आहे, तर त्यांना दक्षिण आफ्रिकेनंतर पाकिस्तानला मात ज्यावी लागेल. पण जर पाकिस्तान ही मालिका जिंकेल तर त्याचं अंतिम सामन्यात पोहोचणं काहीसं सोपं होईल.
3. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका : या दोन्ही संघात डिसेंबर-जानेवारीमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघ सध्या WTC गुणतालिकेत टॉप 2 मध्ये असल्याने या मालिकेतून अंतिम सामन्यासाठीचा एक संघ मिळणं जवळपास निश्चित आहे.
4. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. ही मालिका भारतीय भूमीत होणार आहे. सध्या भारत WTC गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असल्याने ऑस्ट्रेलियाला मात देऊन आपलं आव्हान जिवंत ठेवू शकतो.
अशी आहे WTC गुणतालिका
टीम |
विजयी टक्केवारी |
गुण |
विजय |
पराभव |
अनिर्णित |
NR |
दक्षिण आफ्रीका |
71.43 |
60 |
5 |
2 |
0 |
0 |
ऑस्ट्रेलिया |
70.00 |
84 |
6 |
1 |
3 |
0 |
श्रीलंका |
53.33 |
64 |
5 |
4 |
1 |
0 |
भारत |
52.38 |
75 |
6 |
4 |
2 |
0 |
पाकिस्तान |
51.85 |
64 |
4 |
3 |
2 |
0 |
वेस्ट इंडीज |
50 |
54 |
4 |
3 |
2 |
0 |
इंग्लंड |
33.33 |
64 |
5 |
7 |
4 |
0 |
न्यूझीलंड |
25.93 |
28 |
2 |
6 |
1 |
0 |
बांग्लादेश |
13.33 |
16 |
1 |
8 |
1 |
0 |
हे देखील वाचा-