ENG vs IND : है तैयार हम! इंग्लंडविरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडिया मैदानात
England vs India, 5th Test: भारतीय संघ जुलैच्या सुरुवातीलाच इंग्लंडविरुद्ध सामन्यांना सुरुवात करणार आहे. यावेळी कसोटी सामन्यांसह एकदिवसीय आणि टी20 सामनेही खेळवले जाणार आहेत.
England vs India 5th Test Edgbaston Birmingham : भारत आणि इंग्लंड यांच्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे. आधी एक कसोटी सामना त्यानंतर टी20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जातील. या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघातील (Team India) काही खेळाडू इंग्लंडला पोहोचले देखील आहेत. इंग्लंडमध्ये पोहोचून खेळाडूंनी सराव देखील सुरु केला असून बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंचे मैदानावर सराव करतानाचे फोटो शेअऱ केले आहेत. यामध्ये विराट, पुजारा, शुभमन, शार्दूल, बुमराह असे खेळाडू दिसत आहेत.
सध्या टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर आयर्लंडविरुद्ध 26 आणि 28 जूनरोजी दोन टी20 सामने खेळणार आहे. ज्यानंतर इंग्लंडविरुद्ध भारत कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामने खेळणार आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर खालीलप्रमाणे सामने पार पडणार आहेत.
इंग्लंड विरुद्ध भारत टी-20 मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 7 जुलै | एजेस बाउल |
दुसरा टी-20 सामना | 9 जुलै | एजबॅस्टन |
तिसरा टी-20 सामना | 10 जुलै | ट्रेंट ब्रिज |
इंग्लंड- भारत एकदिवसीय मालिका वेळापत्रक-
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 12 जुलै | ओव्हल |
दुसरा एकदिवसीय सामना | 14 जुलै | लॉर्ड्स |
तिसरा एकदिवसीय सामना | 17 जुलै | मँचेस्टर |
भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (विकेटकिपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
हे देखील वाचा-