'विराटच्या खांद्यावर बंदूक ठेवून, सर्व टीम इंडिया वाचत आहे,' पाकिस्तानच्या माजी कर्णधाराची प्रतिक्रिया
Virat Kohli : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्यावर विविध टीका होत आहेत. पण पाकिस्तानचा माजी कर्णधार मात्र विराटच्या बाजूने बोलला आहे.
Virat Kohli Team India : क्रिकेट जगतातील दिग्गज फलंदाज, सध्या सर्वाधिक शतकं नावावर असलेला खेळाडू, माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागील काही काळापासून खास फॉर्ममध्ये नसल्याचं दिसून येत आहे. कधीकधी अर्धशतक ठोकणारा कोहली 2019 पासून शतक मात्र ठोकू शकलेला नाही. त्यामुळेच विविध माजी क्रिकेटर आणि क्रिकेटतज्ज्ञ त्याच्यावर टीका करत असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतिफ (Rashid Latif) मात्र कोहलीची बाजू घेत समोर आला आहे. तसंच कोहलीच्या खराब फॉर्ममुळे इतर संघातील खेळाडूंचा खराब फॉर्म लपला जात असल्याचंही राशिद म्हणाला आहे.
राशिदने Caught Behind या युट्यूब चॅनेवर बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघ 2019 चा विश्वचषक, नंतर टी20 विश्वचषक दोन्हीही कोहलीच्या नेतृत्त्वाखाली जिंकू शकला नाही. याबाबत बोलताना राशिद म्हणाला,''जर विराट खराब फॉर्ममध्ये आहे, तर इतर संघ काय करत आहे. विराटच्या खराब फॉर्ममागे संपूर्ण भारतीय संघ वाचला जात आहे.'' याशिवाय विराटच्या खराब फॉर्मवर बोलताना राशिद म्हणाला, ''विराटचा खराब फॉर्म हा मानसिक नसून तांत्रिक आहे. कारण त्याने ज्याप्रकारे खेळीची सुरुवात केली, तेव्हा त्याने एक उत्तम स्ट्रेट ड्राईव्ह मग सुंदर कव्हर ड्राईव्ह खेळला. फुल लेन्थ डिलेव्हरीला विराट अगदी योग्यप्रकारे खेळल्याचं दिसून आलं. पण त्यानंतरच्या डिलेव्हरी दरम्यान विराट योग्य फुटवर्क करु शकला नाही आणि कट लागून झेलबाद झाला. त्यामुळे त्याला काही डिलेव्हरींना खेळताना अडचण येत असल्याने भारतीय प्रशिक्षकांनी त्याबाबत काळजी घ्यायला हवी''
'विराटला संघाबाहेर ठेवणारा अजून जन्माला आलेला नाही.'
यावेळी राशिदने विराटच्या बाजूने बोलताना आणखी एक महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. मागील बऱ्याच काळापासून कोहली खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याला संघातून ड्रॉप करण्याचा निर्णय घ्यावा, तसंच असं झाल्यास आश्चर्य वाटणार नाही, अशा प्रतिक्रिया समोर येत होत्या. पण राशिदने मात्र विराटच्या बाजूने बोलताना, ''विराटला संघाबाहेर ठेवणारा सिलेक्टर अजून जन्माला आलेला नाही.' अशी दमदार प्रतिक्रिया दिली आहे. ''2019 विश्वचषकानंतर खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराटची सरासरी अजूनही चांगली आहे, त्याने 10 अर्धशतकही या दरम्यान झळकावली आहेत. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवलं जाऊ शकत नाही.'' असं राशिद म्हणाले.
हे देखील वाचा-
- ICC T20 World Cup : बुमराह बेस्ट बॉलर, पण बीसीसीआयनं एका गोष्टीची काळजी घेणं गरजेचं, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूचा सल्ला
- World Athletics Championships: मुरली श्रीशंकरची ऐतिहासिक कामगिरी; पुरुषांच्या लाबं उडी फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय
- Singapore Open: पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक, सेमीफायनलमध्ये सेईना कावाकामीला नमवलं