एक्स्प्लोर
पुण्यात भीषण अपघात, बसची दुचाकीला धडक, तिघांचा मृत्यू, मोटरसायकलला फरफटत नेलं, Photos
दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बसने दुचाकीला काही अंतर फरफटत नेले, त्यामुळे दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
Pune Accident
1/6

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर-भीमाशंकर रस्त्यावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला.
2/6

घोडेगाव शहराजवळील पळसटीका फाट्यावर खासगी प्रवासी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तिघा युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
3/6

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश नंबरची खासगी प्रवासी बस भीमाशंकरच्या दिशेने जात होती. त्याच वेळी, कोळवाडी गावातील तिघेजण दुचाकीवरून घोडेगाववरून मंचरच्या दिशेने जात होते.
4/6

पळसटीका फाट्याजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बसने दुचाकीला काही अंतर फरफटत नेले, त्यामुळे दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
5/6

या अपघातात दुचाकीवरील तीन तरुणांचा जाग्यावरच मृत्यू झाला. मृतांची ओळख कोळवाडी (ता. आंबेगाव) येथील अथर्व खमसे, गणेश असवले, आणि भारत वाजे अशी झाली आहे.
6/6

अपघाताची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पंचनामा करून मंचर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Published at : 15 Jul 2025 05:18 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















