एक्स्प्लोर
कौस्तुभ धवसे मुख्यमंत्र्यांचे नवे मुख्य गुंतवणूक सल्लागार; 11 वर्षांपासून फडणवीसांचे विश्वासू अधिकारी
महाराष्ट्र सरकारच्या अलीकडील आदेशानुसार कौस्तुभ धवसे यांची मुख्यमंत्रांचे मुख्य सल्लागार – गुंतवणूक व धोरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Kastubh dhavase Chief Investment adviser of CM
Source : Abp
मुंबई : महाराष्ट्र हे देशाच्या विकासात मोठं योगदान देत देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) आहे. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रातील गुंतवणुकीकडे देशाचे लक्ष लागलेले असते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सातत्याने महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक यावी, उद्योगधंदे वाढावेत आणि रोजगारनिर्मित्ती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यातच, आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य गुंतवणूक सल्लागार म्हणून कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक (Investment) आणण्याच्या दृष्टीने धवसे यांची नेमणूक करण्यात आल्याचे सांगितले जाते. गेल्या 11 वर्षांपासून धवसे हे फडणवीसांचे विश्वासू अधिकारी आहेत. यापूर्वी धवसे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता, महाराष्ट्रातील गुंतवणुकीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
प्रशासनातील तज्ज्ञांची वाढती भूमिका अधोरेखित करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात, महाराष्ट्र सरकारच्या अलीकडील आदेशानुसार कौस्तुभ धवसे यांची मुख्यमंत्रांचे मुख्य सल्लागार – गुंतवणूक व धोरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सन 2014 पासून मुख्यमंत्री यांचे सह सचिव व विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत असलेल्या धवसे यांनी महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, जागतिक गुंतवणूक, तंत्रज्ञान धोरण आणि संस्थात्मक भागीदारी यासारख्या अनेक दूरदृष्टीच्या उपक्रमांच्या रचनेत मोलाची भूमिका बजावली आहे.
दादरमध्ये जन्मलेले आणि अंधेरीत वाढलेले धवसे हे डी.जे. संगवी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पदवीधर असून, एस.पी. जैन संस्थेतून पीजीडीएम आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट येथून पब्लिक पॉलिसी डिग्री घेतलेली आहे. महाराष्ट्र शासनात पारंपरिक नोकरशाहीबाहेरून आलेल्या धवसे यांनी 2014 पासून वरिष्ठ पदांवर सेवा बजावली असून, त्यांची ही नियुक्ती अशा व्यावसायिकाची प्रशासकीय शिखरापर्यंत झालेली दुर्मिळ आणि प्रभावी वाटचाल आहे. हे पद राज्य सरकारच्या प्रशासनात अशा गैर-सेवा तज्ज्ञाने गाठलेले सर्वोच्च स्तर मानले जात आहे.
मागील दशकभरात धवसेंनी खालील उपक्रमांमध्ये केलंय नेतृत्व
1. महाराष्ट्राला भारतातील आघाडीचे थेट विदेशी गुंतवणूक (FDI) केंद्र म्हणून प्रतिष्ठित करणे.
2. फिनटेक, डेटा सेंटर्स, सेमिकंडक्टर्स, लॉजिस्टिक्स आणि AI क्षेत्रातील धोरणात्मक गुंतवणूक पुढे नेणे.
3. मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमचे नेतृत्व करणे आणि ₹1.8 लाख कोटींच्या पायाभूत प्रकल्पांना गती देणे.
नवीन पदनामांतर्गत त्यांच्या कार्यक्षेत्रात राज्याची गुंतवणूक धोरणे, एफडीआय सुलभता, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख उपक्रम, जागतिक भागीदारी आणि मुख्यमंत्री वॉर रूमचे नेतृत्व यांचा समावेश आहे.
ही नेमणूक महाराष्ट्र शासनाच्या आधुनिक प्रशासन, विकास आणि धोरणनिर्मितीत कार्यक्षम व्यावसायिकांना सामावून घेण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक मानली जात आहे.
या उन्नतीसह, कौस्तुभ धवसे हे भारतीय सार्वजनिक प्रशासनाच्या पुनर्रचनेत योगदान देणाऱ्या निवडक पार्श्वभूमीतील नेत्यांच्या विशिष्ट गटात सामील झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी प्रचिती असलेले धावसे आता नव्या पदावर कशी कामगिरी करतील याच्यावर लक्ष असेल
हेही वाचा
जन्मजयराजे भोसलेंनी माझा विश्वास घात केला; वंगणफेक हल्ल्यानंतर पहिल्यांच बोलले प्रवीण गायकवाड
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
कोल्हापूर
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
Advertisement






















