एक्स्प्लोर
Mumbai Court Infrastructure | खासदार Ravindra Waikar यांनी Andheri Court मधील वकील समस्यांवर दिले आश्वासन.
खासदार रवींद्र वायकर यांनी आज अंधेरी कोर्टाला भेट दिली. यावेळी त्यांनी वकील वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. अंधेरी कोर्टाच्या इमारतीची क्षमता प्रत्यक्षात चारशे वकिलांची आहे, मात्र सध्या चार हजारांहून अधिक वकील येथे कार्यरत आहेत. यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वकील वर्गाने खासदार वायकर यांच्याकडे जागा, खुर्च्या, कपाटे आणि इतर सुविधांच्या अभावाबाबत तक्रारी मांडल्या. "माझ्या हिशाबसे जवळजवळ आठ कोर्ट आहेत. आठ कोर्ट वसायला कोर्टमध्ये आतमध्ये जागा नाहीये त्यानंतर त्या खुर्च्या नाहीत. बाकीच्या नाही आणि सर्वांची कपाटं हे पावसामध्ये दिसतायत. म्हणजे प्रत्येकाच्या ज्यांचे वकील असतील आणि नऊशे वकील या इथं जवळजवळ येतात दिवसाला आणि नऊशे वकीलांना बसायची उठायची कसलीही व्यवस्था नाहीये. पोलीस देखील अशा परिस्थितीमध्ये आहेत. बाहेर टायपिंग जी करतात ती देखील अशी अवास्तव आहे त्यानंतर घाणीचं पाणी वगैरेसमवून नाहीत," असे एका वकिलाने सांगितले. वायकर यांनी या समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. पीडब्ल्यूडी आणि स्लम बोर्डाच्या माध्यमातून कामे करून दोन मजले वाढवण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. यावेळी अंधेरी बार असोसिएशनने खासदार वायकरांचा सत्कार केला.
मुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा























