(Source: Poll of Polls)
साखरपुड्यानंतर भावी पत्नी पळून गेली, व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने तरुणाला अमानुष मारहाण; आरोपी फरार
साखरपुडा झाल्यानंतर लग्न जमलेली तरुणी प्रियकरासोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या तरुणाने व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं.

धाराशिव : डिजिटल इंडियात सोशल मीडियातील लहान-सहान गोष्टीवरुन वाद होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. फेसबुक, व्हॉट्सअप (Whatsapp) स्टेटसवरुन देखील भांडणं झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, अलिकडे रिल्स बनवून हवा करणाऱ्यांची संख्या, नव्या भाई लोकांची डिजिटल दादागिरी पाहायला मिळत आहे. त्यातच, आता धाराशिवमध्ये (Dharashiv) व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्यावरुन झालेल्या वादातून एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. लग्न (Marriage) जमलं, साखरपुडाही झाला होता, पण होणाऱ्या बायकोने धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं म्हणून तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे.
साखरपुडा झाल्यानंतर लग्न जमलेली तरुणी प्रियकरासोबत पळून गेल्याने संतप्त झालेल्या तरुणाने व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं. या स्टेटसमध्ये तरुणीने धोका दिल्याचा उल्लेख होता, त्यावरुन झालेल्या वादातून तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तरुणावर उपचार सुरू असून सध्या धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरच्या सरकारी रुग्णालयात तो दाखल आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथील ही घटना असून याप्रकरणी तुळजापूर पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीच्या प्रियकराकडून विरहाचे स्टेटस ठेवणाऱ्याला अमानुष मारहाण झाली असून गुन्हा घडल्यापासून आरोपी तरुणीसह फरार आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीसह तरुणीचाही शोध सुरू आहे.
जिच्या सोबत लग्न जमलं, ती तरुणी प्रियकरासोबत पळून गेली. होणारी बायको पळून गेल्याने धोका दिल्याचे स्टेटस तरुणाने ठेवल्याने वाद झाला. त्यानंतर तरुणाच्या प्रियकराने मित्रांसोबत स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. तरुणाच्या शरीरावर मारण्याच्या गंभीर खुणा पाहायाला मिळत आहेत. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी इथं ही हादरवणारी घटना असून मारहाण झालेल्या तरुणाच्या वडिलांनी आम्हाला न्याय द्यावा, आरोपींवर गंभीर स्वरुपाची कारवाई करावी, असे म्हटलं आहे. ज्या तरुणाला मारहाण झाली त्याच्यावर गेल्या 8 दिवसांपासून धाराशिवच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा
7 वर्षात मी एकदाही सुट्टी घेतली नाही, बायकोलाही सांगितलं; शरद पवारांसमोर जयंत पाटील भावूक



















