एक्स्प्लोर
Electric Water Taxi | मुंबईत 'ई-वॉटर टॅक्सी' १ ऑगस्टपासून, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय
देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. ही ई-वॉटर टॅक्सी येत्या १ ऑगस्टपासून गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक रूट्स टर्मिनस ते जेएनपीटी या दोन जलमार्गांवर नियमित धावेल. ही सेवा केवळ दोन जलमार्गांपुरती मर्यादित न राहता ती टप्प्याटप्प्याने बेलापूर, घारापुरी आणि मांडवा या शहरांपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड परिसरातील नागरिकांना जलमार्गाने प्रवास करण्याचा एक स्वस्त आणि पर्यावरणस्नेही पर्याय मिळणार आहे. ही टॅक्सी सेवा प्रवासाचा वेळ वाचवेल आणि वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल. ही आधुनिक सुविधा मुंबईच्या जलवाहतुकीत एक महत्त्वाचा बदल घडवून आणेल.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















