एक्स्प्लोर
Ind vs Eng 3rd Test: लॉर्ड्सवर हायव्होल्टेज ड्रामा; शुभमन गिल क्रॉलीच्या अंगावर धावला, बोट दाखवले; डकेटलाही भिडला, पाहा Photo
Ind vs Eng 3rd Test: लॉर्ड्स कसोटी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी 6-7 मिनिटांचा कालावधी बाकी होता. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरणं भाग होतं.
Ind vs Eng 3rd Test Shubhman Gill
1/9

भारताचा संघ तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू व्हायच्या अवघी 6 मिनिटं आधी सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडला अखेरच्या दिवशी फलंदाजीला उतरावं लागलं. (Image Credit- ICC)
2/9

2 षटकं नक्कीच होऊ शकली असती, पण बुमराहचं एक षटकंच पूर्ण झालं, याशिवाय मैदानावर मोठा ड्रामा पाहायला मिळाला.(Image Credit- ICC)
3/9

लॉर्ड्स कसोटी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यासाठी 6-7 मिनिटांचा कालावधी बाकी होता. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरणं भाग होतं. (Image Credit- ICC)
4/9

इंग्लंडकडून बेन डकेट आणि जॅक क्रॉलीची जोडी फलंदाजीला उतरली. तर भारताकडून बुमराह गोलंदाजीसाठी आला. (Image Credit- ICC)
5/9

साहजिक जास्त षटकं होऊ नये म्हणून इंग्लंडचा संघ रडीचा डाव खेळणार याची अपेक्षा होती. पण यामुळे मैदानावर मोठा वाद झाला. (Image Credit- ICC)
6/9

भारताचे 10 खेळाडू क्रॉलीच्या जवळ गेले. तसेच मोहम्मद सिराज, नितीश रेड्डी, केएल राहुल, करुण नायर, रवींद्र जडेजा कर्णधार शुभमन गिलसह इंग्लंडच्या फलंदाजाला भिडताना दिसले. (Image Credit- ICC)
7/9

शुभमन गिल आणि जॅक क्रॉली यांच्यात जोरदार राडा झाला. यावेळी शुभमन गिले जॅक क्रॉलीच्या अंगावर धावत गेला आणि हाताने एक्स असं करत इशाराही केला. (Image Credit- ICC)
8/9

शुभमन गिल आणि जॅक क्रॉलीने एकमेकांना बोट दाखवत शाब्दिक वाद झाला.(Image Credit- ICC)
9/9

आज तिसऱ्या कसोटीमधील चौथ्या दिवसाचा खेळ रंगणार आहे. इंग्लंडने सध्या 2 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे कालच्या या राड्यामुळे आज खेळ रंगतदार होणार हे निश्चित. (Image Credit- ICC)
Published at : 13 Jul 2025 09:54 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
























