Yuzvendra Chahal : दुसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाने केली मजा-मस्ती, साजरा केला लाडक्या चहलचा वाढदिवस
Chahal Birthday : चहलचा वाढदिवस साजरा करतानाचे काही व्हिडीओ सूर्यकुमार यादवने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केले असून यामध्ये सूर्याची पत्नीही केकवर ताव मारताना दिसत आहे.
Yuzvendra Chahal Birthday : भारतीय संघ (Team India) सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडीवर असणारी टीम इंडिया आता दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. अशामध्ये दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने रिकाम्या वेळात संघातील सर्वांचा लाडका खेळाडू आणि मुख्य फिरकीपटू युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal Birthday) वाढदिवस साजरा केला.
भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या त्रिनिदादमधील हॉटेलमध्ये थांबला असून याच ठिकाणी चहलचा वाढदिवस सर्वांनी मिळून साजरा केला. यावेळी वाढदिवसावेळी टीम इंडियाने चांगलीच मजा केली. चहलचा चेहरा केकने माखवून टाकल्याचे ही दिसून आले. या सर्वाचे काही खास व्हिडीओ क्रिकेटर सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट केले असून यामध्ये सूर्याची पत्नीही केकवर ताव मारताना दिसत आहे. सूर्यासह इतरही भारतीय खेळाडू यावेळी चहलचा 32 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपस्थित होते. पहिल्या सामन्यात अत्यंत महत्त्वपूर्ण दोन विकेट घेणाऱ्या चहलकडून आजही संघाला मोठ्या अपेक्षा आहेत.
आज कोणाकोणाला संधी?
आज वेस्ट इंडीज विरुद्ध भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळवणाऱ्या अंतिम 11 खेळाडूंचा विचार करता या दौऱ्यामध्ये प्रथमच भारतीय एकदिवसीय संघात एन्ट्री मिळालेला युवा गोलंदाज अर्शदीप सिंह मैदानात उतरु शकतो. त्यामुळे आज त्याचा टीम इंडियासाठी एकदिवसीय सामन्यात डेब्यू होऊ शकतो. याशिवाय आवेश खानला पण आज संधी मिळू शकते. या दोघांपैकी एकजण अक्षर पटेलच्या जागी खेळू शकतो. कारण पहिल्या सामन्यात लेफ्ट आर्म स्पिन ऑलराउंडर अक्षर पटेल हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे सामना सुरु असतानाच बाहेर पडला होता. अशात तो आजचा सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. तर नेमकी अंतिम 11 कशी असू शकते हे पाहूया...
भारताची संभाव्य अंतिम 11 - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, शार्दुल ठाकुर, अर्शदीप सिंह/आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 2nd ODI, Weather Report : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात पावसाचा व्यत्यय? जाणून घ्या हवामानाची स्थिती
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!
- Neeraj Chopra : अन् नीरजनं विश्वास सार्थ ठरवला; जाणून घ्या आजच्या फायनलमधील महत्वाच्या 10 घडामोडी