IND vs WI, 2nd ODI, Weather Report : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात पावसाचा व्यत्यय? जाणून घ्या हवामानाची स्थिती
IND vs WI : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
IND vs WI, 2nd ODI, Weather Report at Park Oval Stadium : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) हा दुसरा एकदिवसीय सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताला मालिकाविजयासाठी तर वेस्ट इंडीजला मालिकेतील आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. अशामध्ये सामन्यात पावसाचा व्यत्यय येईल का? हा महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न समोर येत असताना, हवामान विभागाच्या माहितीनुसार नेमकं सामना होणाऱ्या क्रिकेट मैदानाजवळील वातावरण आज अर्थात 24 जुलै रोजी कसं असेल जाणून घेऊया...
सामना होणार्या क्विन्स पार्क मैदानात पावसाची चिन्ह काही प्रमाणात असल्याचं Weather.com या हवामानाची माहिती देणाऱ्या वेबसाईटने सांगितलं आहे. सकाळच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी येणार असून दुपारपर्यंत पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण असणार आहे. दिवसभर तापमान 30 अंश सेल्सियस तर रात्रीच्या सुमारास 26 अंश सेल्सियसपर्यंत तापमान जाऊ शकतं. दरम्यान दिवसा 15% तर रात्री 6% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आजचा सामना होणाऱ्या मैदानातच पहिला सामना खेळवण्यात आला. विशेष म्हणजे दोन्ही संघानी 300 पार धावसंख्या नेली. केवळ 3 धावांनी भारत जिंकला. पण एक चुरशीचा सामना आज पाहायला मिळाला. दरम्यान मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहलकडे अधिक असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे पहिल्या सामन्याप्रमाणे एक मोठी धावसंख्या होऊ शकते.
हे देखील वाचा-
- Shikhar Dhawan : धवनचं शतक हुकलं, सहाव्यांदा झाला 'नर्व्हस 90' चा शिकार, पण एक खास रेकॉर्ड केला नावावर
- ICC T20 World Cup 2022 : 'विश्वचषकात भारताला कोहलीची गरज पडणार', अजित आगरकरने सांगितलं कारण
- WI Vs IND: अखेरच्या षटकात 15 धावा रोखण्याचं आव्हान, दोन आक्रमक फलंदाज क्रिजवर; त्यांनाही पुरून उरला मोहम्मद सिराज!