Neeraj Chopra : अन् नीरजनं विश्वास सार्थ ठरवला; जाणून घ्या आजच्या फायनलमधील महत्वाच्या 10 घडामोडी
World Athletics Championships : जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सच्या वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ नीरज चोप्रा दूर करेल, असा विश्वास होता. हा विश्वास नीरजनं सार्थ ठरवत रौप्यपदक जिंकलं आहे.
World Athletics Championships 2022: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. जागतिक अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत नीरजनं भारताचा कित्येक वर्षांचा दुष्काळ संपवत रौप्यपदक पटकावलं आहे. त्याला या स्पर्धेत सुवर्णवेध घेता आला नाही मात्र त्यानं कडवी झुंज देत रौप्यपदक मिळवलं. नीरजच्या या पदकानं भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला आहे. भारताच्या एकाही अॅथलिटला गेल्या 19 वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेचं पदक मिळवता आलेलं नव्हतं. 2003 सालच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सच्या वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ नीरज चोप्रा दूर करेल, असा विश्वास होता. हा विश्वास नीरजनं सार्थ ठरवत रौप्यपदक जिंकलं आहे.
आजच्या फायनल सामन्यातील महत्वाच्या दहा घडामोडी
- नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल ठरला तर दुसऱ्या थ्रोमध्ये वापसी करताना त्यानं 82.39 मीटर भाला फेकला.
- तर नीरज चोप्रानं आपल्या तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर भाला फेकत पुन्हा वापसी केली. या प्रयत्नात नीरज पाचव्या स्थानावरुन चौथ्या स्थानी आला.
- नीरज चोप्रा चौथ्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर आला. नीरजने चौथ्या प्रयत्नानंतर 88.13 मीटर्सवर भाला फेकला. हाच त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो ठरला
- ग्रेनाडाच्या वन पीटर्सनं पहिल्या प्रयत्नात 90.21 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 90.46 मीटर भाला फेकला.
- सहाव्या राऊंडमध्ये 90.54 मीटर भालाफेक करणाऱ्या ग्रेनाडाच्या अँडरसनने सुर्वण पदक पटकावलं.
- अंतिम फेरीत नीरज चोप्रासह एकूण 12 खेळाडू होते. नीरज चोप्राचं सुवर्ण पदक थोड्या फरकाने हुकलं.
- नीरजच्या या पदकानं भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला.
- भारताच्या एकाही अॅथलिटला गेल्या 19 वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेचं पदक मिळवता आलेलं नव्हतं.
- भालाफेक फायनलमध्ये 12 खेळाडूंमध्ये नीरजसोबत आणखी एक भारतीय खेळाडू रोहित यादव (Rohit Yadav) देखील होता.
- रोहित यादव तीन प्रयत्नानंतरच फायनलमधून बाहेर झाला. मात्र नीरजनं अपेक्षेप्रमाणं यश मिळवलं
भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला
नीरजच्या या पदकानं भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपला आहे. भारताच्या एकाही अॅथलिटला गेल्या 19 वर्षांत जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेचं पदक मिळवता आलेलं नव्हतं. 2003 सालच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जनं लांब उडीचं कांस्यपदक पटकावलं होतं. त्यानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय अॅथलिट्सच्या वाट्याला आलेला पदकांचा दुष्काळ नीरज चोप्रा दूर करेल, असा विश्वास होता. हा विश्वास नीरजनं सार्थ ठरवत रौप्यपदक जिंकलं आहे.
या स्पर्धेत नीरज चोप्राला ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सकडून कडवे आव्हान मिळेल, असे मानले जात होते. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स हा सध्याचा जगज्जेता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला स्टॉकहोममध्ये नीरज चोप्राला पराभूत करून सुवर्णपदक जिंकताना त्याने यावर्षी तीनदा 90 चा टप्पा ओलांडला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
Neeraj Chopra : अन् नीरजनं विश्वास सार्थ ठरवला; जाणून घ्या आजच्या फायनलमधील महत्वाच्या 10 घडामोडी