(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SA vs NED : नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला फोडला घाम, अखेर डेव्हिड मिलरनं विजय मिळवून देत वाचवली संघाची लाज
NED vs SA: नेदरलँडनं 20 ओव्हरमध्ये 9 विकेट वर 103 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला संघर्ष करावा लागला.
NED vs SA न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँडला चार विकेटनं पराभूत केलं. नेदरलँड विरुद्ध विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला संघर्ष करावा लागला. नेदलँडच्या गोलंदाजांनी कडवा मारा केल्यानं दक्षिण आफ्रिकेला 103 धावांचा पाठलाग करताना 6 विकेट गमवाव्या लागल्या. दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना नेदरलँडनं 9 विकेटवर 103 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला घाम फोडला. डेव्हिड मिलरनं एक बाजू लावून धरत अर्धशतक केल्यानं संघाला विजय मिळवता आला.
नेदरलँडनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 9 विकेटवर 103 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडम मारक्रमनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नेदरलँडच्या साइब्रांड एंगेलब्रेक्टनं सर्वाधिक धावा केल्या. 45 बॉलमध्ये 40 धावा केल्या. लोगान वॉन वीकनं 22 बॉलमध्ये 23 धावा केल्या. नेदरलँडचे इतर चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरले.
दक्षिण आफ्रिकेच्या ओटीनेल बार्टमॅननं चांगली कामगिरी केली. बार्टमॅननं 4 ओव्हरमध्ये 11 धावा देत नेदरलँडच्या 4 विकेट घेतल्या. मार्को यॉन्सेननं 4 ओव्हरमध्ये 20 धावा देत 2 विकेट घेतल्या. तर, नॉर्टजेनं 4 ओव्हरमध्ये 19 धावा देत 2 विकेट घेतल्या.
🇿🇦 win in New York 👏
— ICC (@ICC) June 8, 2024
A gritty 59* from David Miller guides them to their second victory in the #T20WorldCup 2024 🔥#NEDvSA pic.twitter.com/2k4IfUJLsk
नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेला फोडला घाम
डेव्हिड मिलरनं केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर 51 बॉलमध्ये 59 धावांची खेळी केली. यामुळं दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवता आला. श्रीलंकेला बांगलादेशनं पराभूत केलं. अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला पराभूत केलं. यानंतर आणखी उलटफेर होणार की काय अशी शक्यता नेदरलँडच्या आक्रमक गोलंदाजीमुळं निर्माण झाली होती. नेदरलँडनं दक्षिण आफ्रिकेच्या चार विकेट 12 धावा असताना काढल्या होत्या. यानंतर डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्सनं केलेल्या दमदार कामगिरीमुळं दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. डेव्हिड मिलरनं अखेरच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजी करुन संघाला विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड ग्रुप डीमध्ये आहेत. दक्षिण आफ्रिकेनं दोन मॅचमध्ये विजय मिळवत ग्रुपमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. या गटात दक्षिण आफ्रिकेशिवाय नेदरलँड, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :