IND vs PAK: भारत पाकिस्तान मॅचचं तिकिट खरंच दीड कोटी रुपयांना मिळतंय? जाणून घ्या नेमकं कारण अन् सत्य
T20 World Cup 2024: भारत आणि पाकिस्तान उद्या न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. टी 20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ आमने सामने येत आहेत.
![IND vs PAK: भारत पाकिस्तान मॅचचं तिकिट खरंच दीड कोटी रुपयांना मिळतंय? जाणून घ्या नेमकं कारण अन् सत्य IND vs PAK T20 World Cup 2024 India Pakistan Match Ticket Price Latest Sports News in Marathi IND vs PAK: भारत पाकिस्तान मॅचचं तिकिट खरंच दीड कोटी रुपयांना मिळतंय? जाणून घ्या नेमकं कारण अन् सत्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/d5f53d7ad5d1947f593c22672d8d6f5d1717853707348989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ND vs PAK Ticket Price न्यूयॉर्क : आयसीसी टी20 वर्ल्ड कपचं (T 20 World Cup 2024) आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडून करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले असून चार गटात त्यांची विभागणी करण्यात आली आहे. भारतानं (Team India) आयरलँड विरुद्ध विजय मिळवत दमदार सुरु वात केली आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील हायव्होल्टेज मॅच 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मॅच संदर्भात एक माहिती समोर येत आहे. काही चाहत्यांच्या दाव्यानुसार नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील सेक्शन 252 च्या 20 व्या रांगेतील 30 क्रमांकाच्या सीटच्या तिकीटाची रिसेल बाजारात किंमत 175,400 अमेरिकन डॉलर म्हणजेच 1.5 कोटी रुपयांना विकलं जात आहे.
दीड कोटी रुपयांच्या तिकिटाचं रहस्य काय?
मीडिया रिपोर्टर्स नुसार, त्या तिकिटाची किंमत फक्त दीड कोटी रुपये असणं महत्त्वाचं नाही. तिकिटाची विक्री करणाऱ्याची ही मागणी आहे की या किमतीमागे काही रहस्य आहे. सेक्शन 252 च्या जवळपास असलेल्या रागांमधील तिकिटं कमी किमतीला मिळत आहेत. रो-21 मध्ये तिकीट 693 म्हणजेच 58 हजार रुपयांना आणि रो-19 मध्ये 801 डॉलर म्हणजेच 67 हजार रुपयांना मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती दुसऱ्या एका रिसेल वेबसाईटवर याच सेक्शनची तिकीट विकत आहे, मात्र सीट क्रमांक आणि रो बाबत माहिती देत नाही.
आयसीसीच्या वेबसाईटवर तिकिटाची किंमत किती?
मीडिया रिपोर्टर्स नुसार, शुक्रवारी रात्रीपर्यंत अधिकृतपणे आयसीसीच्या वेबसाईटवर काही तिकिटं शिल्लक होती. बाऊंड्री क्लबच्या सीटची किंमत 1500 अमेरिकन डॉलर आणि डायमंड क्लबसाठी 10000 डॉलर इतकी होती. प्रीमियम क्लब लाउंजची काही तिकिटं देखील होती. त्यामध्ये कॉर्नर क्लबसाठी 2750 डॉलर आणि कैबाना साठी 3000 हजार डॉलर किंमत निश्चित करण्यात आली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. क्रिकेट चाहते भारत आणि पाकिस्तान मॅच कधी होणार याची वाट पाहत असतात.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा टी 20 वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येतात चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं. भारतीय क्रिकेट संघान पाकिस्तानच्या संघावर वर्चस्व मिळवलेलं आहे.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)