IND vs PAK : कोहली नको यशस्वी जयस्वालला रोहितसोबत सलामीला पाठवा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा महत्त्वाचा सल्ला
Virat Kohli : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान उद्या आमने सामने येणार आहेत. या मॅचमध्ये विराट कोहलीनं सलामीला येऊ नये, असं टीम इंडियाच्या माजी खेळाडूनं म्हटलं आहे.
![IND vs PAK : कोहली नको यशस्वी जयस्वालला रोहितसोबत सलामीला पाठवा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा महत्त्वाचा सल्ला IND vs PAK Yashasvi Jaiswal may open With Rohit Sharma Navjyot Singh Sidhu said virat play at three marathi News IND vs PAK : कोहली नको यशस्वी जयस्वालला रोहितसोबत सलामीला पाठवा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा महत्त्वाचा सल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/635997eb0576e842417fcee1cb571b481717857985370989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
न्यूयॉर्क : भारतानं (Team India) आयरलँडला पराभूत करत टी20 वर्ल्ड कपमध्ये दमदार सुरुवात केली आहे. भारताच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत आयरलँडला 96 धावांवर रोखलं होतं. यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिषभ पंतच्या (Rishabh Pant) दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघानं ८ विकेटनं मॅच जिंकली होती. भारतातर्फे त्या मॅचमध्ये सलामीला रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli ) आला होता. विराट कोहली केवळ एक रन करुन बाद झाला होता. टीम इंडियातील या प्रयोगाबाबत अनेकांना अंदाज होता. मात्र, पहिल्याच मॅचमध्ये भारतीय संघाला या प्रयोगाचा फायदा झाला नव्हता. त्यामुळं टीम इंडियाच्या माजी खेळाडूंनी या बदलाबाबत भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. नवज्योतसिंग सिद्धूनं विराट कोहलीला पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये सलामीला येऊ नये, असं म्हटलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मानं पाकिस्तान विरुद्ध डावाची सुरुवात करावी, असं सिद्धूनं म्हटलं.
नवज्योतसिंग सिद्धू काय म्हणाला?
नवज्योतसिंग सिद्धूच्या मताप्रमाणं यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मानं डावाची सुरुवात करावी. विराट कोहलीनं तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला यावं, यामुळं भारताची टॉप ऑर्डर मजबूत होईल, असं सिद्धूनं म्हटलं.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला आल्यास डावं उजवं कॉम्बिनेशन फायदेशीर ठरेल. विराट कोहलीनं तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला यावं, असं सिद्धू म्हणाला. मात्र, संघाच्या दृष्टीकोनातून त्यांनी बदल केले असतील. शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांना खेळायला संधी मिळत नव्हती त्यामुळं असे बदल केले असतील, असं सिद्धू म्हणाला. अक्षर पटेल फलंदाजीला 8 व्या स्थानावर फलंदाजीला येईल. या पिचवर गोलंदाजांना फायदा असेल, असं सिद्धू म्हणाला.
भारतानं पहिल्या मॅचमध्ये आयरलँडला पराभूत केल्यानं टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. दुसरीकडे पाकिस्तानला अमेरिकेकडून सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता.
न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर यापूर्वी झालेल्या मॅचेसमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यात संघांना अपयश आलं आहे. सिद्धूनं या पिचबद्दल बोलताना म्हटलं की इथं कोणी 200 धावा होतील, अशा अपेक्षा ठेवू नये, असं म्हटलं.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे सुरुवातीचे सामने वेस्ट इंडिजमध्ये असते तर त्यांना सहाव्या किंवा सातव्या गोलंदाजाची गरज लागली नसती असं म्हटलं. त्यामुळं टीमच्या दृष्टीकोनातून रोहित आणि विराट कोहलीचं कॉम्बिनेशन महत्त्वाचं ठरतं. पहिल्या सहा ओव्हर महत्त्वाच्या आहेत, हे त्यांना माहिती आहेत. त्यानंतर तुम्ही धावा काढू शकता. अमेरिकेतील खेळपट्टीवर 200 धावांची अपेक्षा करु शकत नाही. तुमच्यासाठी 130 ते 140 धावा पुरेशा आहेत, असं सिद्धूनं म्हटलं.
संबंधित बातम्या :
IND vs PAK: भारत पाकिस्तान मॅचचं तिकिट खरंच दीड कोटी रुपयांना मिळतंय? जाणून घ्या नेमकं कारण अन् सत्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)