(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मिलरचा सूर्यादादाने झेल घेतला, पण त्यामागे 150 कॅचचा सराव, राहुल द्रविडकडून 'स्काय'च्या मेहनतीला सलाम!
Suryakumar yadav catch : चेंडू सिमारेषाबाहेर जणार, असेच सर्वांना वाटलं होत. पण सूर्यकुमार यादव धावत आला अन् अशक्यप्राय झेल घेतला. सूर्यकुमारच्या झेलने सामन्याचं चित्र बदलले..
Suryakumar yadav catch : 6 चेंडू 16 धावा... हार्दिक पांड्याच्या हातात चेंडू, फलंदाजीसाठी डेविड मिलर... जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर होत्या. हार्दिकच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने मोठा फटका मारला... चेंडू सिमारेषाबाहेर जणार, असेच सर्वांना वाटलं होत. पण सूर्यकुमार यादव धावत आला अन् अशक्यप्राय झेल घेतला. सूर्यकुमारच्या झेलने सामन्याचं चित्र बदलले.. आपण सर्वांनीच सूर्याने घेतलाला हा झेल पाहिला.. यावरुन वादंगही झालं. पण सूर्यकुमार यादवने अचूक झेल टिपला. अचूक अंदाज घेत सूर्यकुमार यादवने विजयात मोलाचा वाटा उचलला. विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचे आता जगभरातून कौतुक होते. जगज्जेते खेळाडू जिथे जाईल, तिथे त्यांना सन्मान दिला जातोय. सूर्या, हार्दिक असो अथवा रोहित शर्मा सर्वांना त्या अखेरच्या झेलबद्दल विचारले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खेळाडूंशी गप्पा मारता त्या निर्णायक झेलबद्दल विचारलं. त्यावर सूर्यकुमार यादवने झेल कसा घेतला, त्यावेळची समयसूचकता सर्वकाही सांगून टाकलं. मोदींनीही सूर्याचं कौतुक केलेच. पण त्यावेळी गुरु राहुल द्रविड यांनी सूर्याची त्या झेलमागील मेहनत सांगितली.
मोदींनी अखेरचा षटकाचा उल्लेख करत हार्दिकला विचारलं, सूर्याने झेल घेतल्यानंतर काय म्हणालात? त्यावर हार्दिक म्हणाला की, सूर्याने जेव्हा झेल घेतला, त्यावेळी आम्ही सेलीब्रेशन केले. पण त्यानंतर सूर्याला विचारलं परफेक्ट झेल घेतलाय का? त्यावेळी त्यानं सकारात्मक प्रतिक्रिया दिली. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यावर मोदींनी सूर्यालाही त्या झेलविषयी विचारले. त्यावर सूर्या म्हणाला.. सुरुवातीला झेल घेण्याचा माझ्या डोक्यात विचार नव्हता. फक्त बॉल अडवून आतमध्ये टाकण्याचाच विचार होता. एक-दोन धावा जातील, असाच फक्त विचार होता. पण त्यावेळी झेल हातात आल्यानंतर दुसऱ्या बाजूला टाकण्याचा विचार आला. पण रोहित शर्मा खूप दूर होता. त्यामुळे मैदानात चेंडू फेकला अन् त्यानंतर आतमध्ये येत झेल घेतला.
#WATCH | During his interaction with PM Narendra Modi, Suryakumar Yadav said, "...At that moment I did not think whether I would be able to catch the ball or not and once the ball came in my hand, I had to pick it up and pass it to the other side... We have practised this thing a… pic.twitter.com/1dJ3G4taEd
— ANI (@ANI) July 5, 2024
पण या प्रसंगासाठी आम्ही खूप सराव केला होता. बॅटिंग तर मी करेल. पण त्यानंतर मी संघासाठी आणखी कुठे कामाला येईल. फिल्डिंगमध्ये वैगरे... असे सूर्या म्हणाला.
यावर बोलताना राहुल द्रविड म्हणाला की, सूर्यकुमार यादव याने सरावावेळी आशा पद्धतीचे 150 ते 160 झेल घेतले आहेत.
या स्पर्धेआधी आणि आयपीएलदरम्यान आम्ही अशा झेलचा सराव केला. पण विश्वचषकातील आशा प्रसंगावेळी अशी संधी मिळेल, असा कधीच विचार केला नव्हता. पण आशा झेलचा सराव केलेला होता. त्यामुळे दबावाच्या प्रसंगातही शांत होतो. तो प्रसंग माझ्यासाठी नेहमीच खास राहील.. असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
आणखी वाचा :
अहंकार वाढला की... पंतप्रधान मोदींना काय म्हणाला विराट कोहली?