Mayank Agarwal: क्रिकेटर मयांक अग्रवालनं आपल्या मुलाचं नाव काय ठेवलं? ऐकून तुम्हीही विचारात पडाल
भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि त्याची पत्नी आशिता सूद (Aashita Sood) यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं.

भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि त्याची पत्नी आशिता सूद (Aashita Sood) यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. मयांक अग्रवालनं स्वत: सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. अग्रवालनं सांगितलं की, त्यांच्या मुलाचा जन्म या महिन्याच्या 8 तारखेला झाला असून आम्ही त्याचं नाव 'आयांश' (Aayansh) ठेवलंय.
मयांक आणि आशिताचं लग्न 4 जून 2018 रोजी झालं होतं. यापूर्वी दोघांनी एकमेकांना सात वर्षे डेट केलं होतं. दोघे बंगळुरूमध्ये भेटले होते, जेथे त्यांच्या पालकांनी दिवाळी सेलिब्रेशनचे आयोजन केलं होतं. त्यावेळी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.
मयांक अग्रवालचं ट्वीट-
With our hearts full of gratitude, we introduce Aayansh ♥️
— Mayank Agarwal (@mayankcricket) December 11, 2022
The first Ray of light, a part of US & a Gift of God🧿🧿
08.12.2022 ♥️ pic.twitter.com/mPqW7FTSjl
मयांक अग्रवालची सोशल मीडिया पोस्ट
मयांक अग्रवालनं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून त्याच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती दिली. "आम्ही कृतज्ञ अंतःकरणानं अयांशची ओळख करून देतो. प्रकाशाचा पहिला किरण, आमच्या परिवारातील एक भाग आणि देवाकडून मिळालेली भेट. 08-12-2022"
मयांक अग्रवाल पंजाबच्या संघातून रिलीज
आयपीएलच्या मागच्या हंगामात मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. एवढेच नव्हेतर पंजाबच्या संघाला प्ले ऑफमध्ये स्थानही मिळवता आलं नाही. यामुळं पंजाबच्या संघानं आयपीएल 2023 च्या ऑक्शनपूर्वी मयांक अग्रवालला रिलीज केलं. आगामी आयपीएल 2023 साठी मयांक अग्रवालनं त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये ठेवली आहे. 23 डिसेंबर रोजी कोची येथे लिलाव होणार आहे. अग्रवालचा मागचा हंगाम चांगला गेला नसेल, पण तो किती आक्रमक फलंदाज आहे? हे सर्वांनाच माहीत आहे.
मयांक अग्रवालची आयपीएल 2022 मधील कामगिरी
मयांकनं आयपीएलच्या मागच्या हंगामात 13 सामने खेळले. ज्यात त्यानं 16.33 च्या सरासरीनं आणि 122.5 च्या स्ट्राइक रेटनं फक्त 196 धावा केल्या. मात्र, या हंगामातील कामगिरी बाजूला ठेऊन अग्रवाल पुढील हंगामात चांगली कामगिरी करण्याचा विचार करेल. भारताचा अनुभवी फलंदाज शिखर धवनची पंजाब संघाच्या नव्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
