IND vs BAN Test Series Schedule: भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला 14 डिसेंबरपासून सुरुवात; येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
IND vs BAN Test Series Schedule: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
IND vs BAN Test Series Schedule: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत (India vs Bangladesh) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबरदरम्यान खेळला जाईल. एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत बांगलादेशच्या संघाला पराभवाची धुळ चारण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील वेळापत्रकावर एक नजर टाकुयात.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळली जाणारी ही मालिका भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची आहे. भारताला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा बळकट करण्यासाठी बांगलादेशला 2-0 नं पराभूत करावं लागणार आहे.
भारत-बांगलादेशमध्ये रंगणार कसोटी सामन्यांचा थरार
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.
भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 14-18 डिसेंबर 2022 | झहूर अहमद चौधरी स्टेडियम |
दुसरा कसोटी सामना | 22-16 डिसेंबर 2022 | शेर-ए-बांगला स्टेडियम |
कधी, कुठं पाहायचा सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबर दरम्यान रोजी खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी 9. 30 वा सामन्याला सुरूवात होईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. हा बांगलादेशच्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लिव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स पाहता येतील.
हे देखील वाचा-