शुभमन गिल कॅप्टन म्हणून पास पण फलंदाज म्हणून एक गोष्ट कमी होती, निवड समितीच्या माजी अध्यक्षांचं परखड मत
Shubman Gill : टीम इंडियाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष साबा करीम यांनी शुभमन गिल कॅप्टन म्हणून यशस्वी ठरल्याचं म्हटलंय.
नवी दिल्ली : भारत आणि झिम्बॉब्वे (IND vs ZIM) यांच्यातील पाच सामन्यांची टी 20 मालिका नुकतीच पार पडली. भारतानं 4-1 अशी मालिका जिंकली. टीम इंडियाची (Team India) यंग ब्रिगेड बीसीसीआयनं झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर पाठवली होती. या दौऱ्याचं नेतृत्त्व शुभमन गिलकडे (Shubman Gill) देण्यात आलं होतं. शुभमन गिलसाठी ही मोठी संधी होती. कारण, शुभमन गिलकडे पहिल्यांदा भारतीय संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं होतं. भारतानं मालिकेतील पहिली मॅच गमावल्यानंतर शुभमन गिलवर दबाव निर्माण झाला होता. मात्र, भारतानं कमबॅक करत सलग चार मॅच जिंकल्या. भारताच्या यंग ब्रिगेडच्या कामगिरीवर निवड समितीचे माजी अध्यक्ष साबा करीम यांनी मत मांडलं आहे.
शुभमन गिल कशात कमी पडला?
शुभमन गिलच्या कामगिरीवर निवड समितीचे माजी अध्यक्ष साबा करीम यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. साबा करीम यांनी शुभमन गिलनं ज्या प्रकारे भारताच्या टीमचं नेतृत्त्व केलं त्यानं प्रभावित असल्याचं म्हटलं. मात्र, शुभमन गिल सलामीवीर म्हणून सातत्य राखण्यात अपयशी ठरल्याचं साबा करीम म्हणाले. गिलनं पाच मॅचेसमध्ये 170 धावा केल्या होत्या. मालिकेत सर्वाधिक धावा शुभमन गिलनं केल्या असल्या तरी गोलंदाजांवर दबाव निर्माण करण्यात तो अपयशी ठरला.
शुभमन गिलला सर्व म्हणजेच पाच मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, अभिषेक शर्मा आणि यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड प्रभावी ठरले, असं साबा करीम म्हणाले.
शुभमन गिलला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संघात स्थान मिळालं नव्हतं. शुभमन गिलला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आली होती. भारतीय निवड समितीनं शुभमन गिलवर विश्वास ठेवत झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावेळी कॅप्टन म्हणून संधी देत विश्वास टाकला होता.
रोहित शर्मानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे खेळाडू उपलब्ध नसल्यानं शुभमन गिलला झिम्बॉब्वेचा कॅप्टन करण्यात आलं होतं. साबा करीम यांनी शुभमन गिल कॅप्टन म्हणून यशस्वी ठरला मात्र फलंदाज म्हणून त्याच्यामध्ये सातत्य नव्हतं, असं म्हटलं.
शुभमन गिल कॅप्टन म्हणून यशस्वी ठरला मात्र त्याचवेळी तो सलामीवर म्हणून त्याच्या फलंदाजीत सातत्य राखण्यात अपयशी ठरल्याचं साबा करीम म्हणाले. यशस्वी जयस्वालला टी 20 वर्लड कपमध्ये संधी मिळाली नाही मात्र तो झिम्बॉब्वे दौऱ्यात चांगली फलंदाजी करण्यात यशस्वी ठरल्याचं साबा करीम म्हणाले.
संबंधित बातम्या :