'तो तामिळनाडूचा असता तर आत्तापर्यंत वगळला...', माजी क्रिकेटपटू टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंवर संतापला, BCCIची काढली खरडपट्टी
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले.
S Badrinath On Shubman Gill IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सलग तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगले. कांगारूंच्या भूमीवर फलंदाजांच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे भारतीय संघाला पाच सामन्यांच्या मालिकेत 1-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे भारतीय संघाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) ची अंतिम फेरी गाठण्याची संधीही गमवावी लागली. आता WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने येतील. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाजच फ्लॉप राहिले नाही, तर शुभमन गिलसारखे युवा फलंदाजही काही खास कामगिरी करू शकले नाही.
दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल आता टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे. या मालिकेत शुभमनने एकूण 5 डावात 18.60 च्या सरासरीने 93 धावा केल्या, ही क्रमांक-3 फलंदाजाची अतिशय सरासरी कामगिरी होती. आता माजी क्रिकेटर सुब्रमण्यम बद्रीनाथने शुभमन गिल आणि टीम इंडियाच्या निवडीबाबत एक मोठे विधान केले आहे. बद्रीनाथने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) संघ निवडीत प्रादेशिक भेदभाव केल्याचा आरोपही केला. बद्रीनाथने शुभमनवर टीका करताना म्हटले की, तो तामिळनाडूचा असता तर त्याला संघातून वगळले असते.
बद्रीनाथ स्टार स्पोर्ट्स तमिळला म्हणाला की, 'शुभमन गिल तामिळनाडूचा असता तर त्याला संघातून वगळले असते.' बद्रीनाथच्या म्हणण्यानुसार, शुभमन उत्तर भारतातील असल्यामुळे त्याला संघात ठेवण्यात आले आहे.
बद्रीनाथ पुढे म्हणाला, 'तुम्ही धावा करू शकत नसाल तर किमान आक्रमक तरी खेळा. त्याने गोलंदाजांना थकवावे, क्रिझवर वेळ घालवून बाकीच्या खेळाडूंना मदत करावी अशी माझी इच्छा होती. 100 चेंडू खेळा आणि गोलंदाजाला थकवा. हे संघासाठी तुमचे योगदान असेल. लॅबुशेन आणि मॅकस्वीनी यांनीही काही सामन्यांमध्ये असेच केले. त्याने खरेतर बरेच डॉट बॉल खेळून बुमराहला थकावले होते.
बद्रीनाथ म्हणतो, तुम्हाला तिथे उभे राहून चांगली कामगिरी करावी लागेल. चार लोक तुमच्याबद्दल लिहितील. त्यावेळी तुम्ही तिथे जा आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करा. जे मला या मालिकेत शुभमन गिलकडून दिसले नाही. मैदानावर त्याचे क्षेत्ररक्षण सरासरी होती, स्लिप आणि पॉइंटवर क्षेत्ररक्षण करताना त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. तो संघासाठी काय योगदान देतो?
हे ही वाचा -