Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मावर फॉर्मवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Daryll Cullinan on Rohit Sharma Fitness : सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मावर फॉर्मवरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs AUS) रोहित फ्लॉप ठरला होता. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर डॅरिल कलिनननेही रोहितवर निशाणा साधला आहे.
डॅरिल कलिननने रोहित शर्माच्या खराब फॉर्म आणि फिटनेसवर टीका केली आहे. बिग क्रिकेट लीग (BCL) दरम्यान एका मुलाखतीत कलिननने दावा केला की, हिटमॅन हा फक्त सपाट ट्रॅक दादागिरी करणारा आहेत जो केवळ घरच्या जमिनीवर कसोटी सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवू शकतो. डॅरिल एवढ्यावरच थांबला नाही, त्याने रोहित शर्मा फॅट नसल्याचे सांगितले आणि त्याचे वजन खूप जास्त असल्याचे म्हणाला.
Adelaide ✅
— BCCI (@BCCI) December 11, 2024
Hello Brisbane 👋#TeamIndia | #AUSvIND pic.twitter.com/V3QJc3fgfL
रोहित शर्माबद्दल डॅरिल कलिनन नक्की काय म्हणाला?
रोहित शर्माचं वजन खूप जास्त आहे. तो खूप काळ क्रिकेट खेळणारा खेळाडू नाही. 4 किंवा 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी तो फिटच वाटत नाही. तो फक्त 'फ्लॅट ट्रॅक'वर खेळणारा खेळाडू आहे. रोहितला बघा अन् विराटलाही बघा. दोघांमधील फिटनेसमध्ये खूप अंतर आहे.
रोहितची खराब फॉर्मशी झुंज...
रोहितबद्दल बोलायचे झाले तर, न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेतही तो विशेष काही करू शकला नाही. तीन कसोटींच्या सहा डावांत त्याला केवळ 91 धावा करता आल्या. रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत खेळला नव्हता. ॲडलेड कसोटीत तो आला. मधल्या फळीत फलंदाजी करताना रोहितला या सामन्याच्या दोन डावात केवळ तीन आणि सहा धावा करता आल्या. या सामन्यानंतर, स्पोर्ट्स टाकला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावसकर यांनीही रोहितने आपल्या नियमित जागेवर यावे, असे म्हटले होते.
Australia win the second Test and level the series.#TeamIndia aim to bounce back in the third Test.
— BCCI (@BCCI) December 8, 2024
Scoreboard ▶️ https://t.co/upjirQCmiV#AUSvIND pic.twitter.com/Tc8IYLwpan
2024 बद्दल बोलायचे झाले तर, हे वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये रोहितसाठी काही खास राहिलेले नाही. 12 कसोटींच्या 23 डावांत तो 27.13 च्या सरासरीने केवळ 597 धावा करू शकला. 14 डिसेंबरपासून होणाऱ्या गाबा कसोटीत रोहित पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा आहे.
हे ही वाचा -