एक्स्प्लोर

Rohan Jaitley: मोठी बातमी: भाजपच्या नेत्याचा मुलाग जय शाह यांची जागा घेणार; बीसीसीआयचा सचिव होणार

BCCI Rohan Jaitley: 1 डिसेंबरनंतर जय शाह यांच्या पदाची धुरा कोण घेणार?, याची चर्चा रंगली आहे.

Rohan Jaitley: जय शाह (Jay Shah) आयसीसीचे अध्यक्ष बनले असून त्यांचा कार्यकाळ 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सध्या जय शाह हे बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहत आहेत, पण 1 डिसेंबरनंतर जय शाह यांच्या पदाची धुरा कोण घेणार?, याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

एका वृत्तानुसार, जय शाह यांच्यानंतर दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली (Rohan Jaitley) यांना बीसीसीआयचे सचिव बनवले जाऊ शकते. रोहन जेटली यांच्याशिवाय गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांचेही नाव बीसीसीआय सचिव होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, या पदासाठी रोहन जेटली हेच नाव आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. 

कोण आहे रोहन जेटली?

रोहन जेटली हे दिवंगत राजकारणी आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत आणि सध्या ते दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. रोहन जेटली हे 2020 मध्ये प्रथमच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झाले. यानंतर त्यांनी 2021 मध्ये विकास सिंग यांचा पराभव करून दोनदा विजय मिळवला. रोहन जेटली यांना क्रीडा प्रशासक म्हणून चांगला अनुभव आहे. यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहनच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या लीगमध्ये ऋषभ पंत आणि इशांत शर्मासारख्या मोठ्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. 

जय शाह यांची बिनविरोध निवड-

आयसीसी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी जय शाह यांना मोठा पाठिंबा मिळाला होता. जय शाह यांच्या उमेदवारीला 16 पैकी 15 सदस्यांनी पाठिंबा दिला होता. नवनियुक्त जय शाह 1 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. न्यूझीलंडचे विद्यमान आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. ग्रेग बार्कले 2020 पासून आयसीसीचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा या पदावर राहण्यास नकार दिला होता, त्यानंतर जय शहा यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. आयसीसीचे अध्यक्ष बनणारे जय शाह सर्वात तरुण भारतीय आहेत. 

संबंधित बातमी:

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती महिला नव्हे पुरषच, अखेर सिद्ध झालं; वैद्यकीय अहवालातून रहस्य उलघडलं!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Team India Schedule Super-8 T20 World Cup 2026 : 3 सामने अन् सेमीफायनलचं तिकीट, सुपर-8 मधील टीम इंडियाचं संभाव्य वेळापत्रक; कधी अन् कोणाविरुद्ध भिडणार?, A टू Z माहिती
3 सामने अन् सेमीफायनलचं तिकीट, सुपर-8 मधील टीम इंडियाचं संभाव्य वेळापत्रक; कधी अन् कोणाविरुद्ध भिडणार?, A टू Z माहिती
Pakistan T20 World Cup Super-8 Scenario : भारताने हरवलं, पण नशिबाची साथ; पाकिस्तान अजूनही सुपर-8 मध्ये पोहोचू शकतो, कसं? जाणून घ्या समीकरण
भारताने हरवलं, पण नशिबाची साथ; पाकिस्तान अजूनही सुपर-8 मध्ये पोहोचू शकतो, कसं? जाणून घ्या समीकरण

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Embed widget