(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती महिला नव्हे पुरषच, अखेर सिद्ध झालं; वैद्यकीय अहवालातून रहस्य उलघडलं!
Imane Khelif Paris Olympics 2024: ऑलिम्पिकच्या व्यवस्थापनावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
Imane Khelif Paris Olympics 2024: अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने (Imane Khelif) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. 25 वर्षीय इमाने खलीफने महिलांच्या 66 किलो गटाच्या अंतिम सामन्यात चीनच्या यांग लिऊचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते. मात्र ऑलिम्पिकदरम्यान इमाने खलीफवरुन वाद समोर आला होता. आता एका वैद्यकीय अहवालातून इमाने खलीफ महिला नसून पुरुष असल्याचं उघड झालं आहे. इमाने खलीफच्या शरीरात XY गुणसूत्र असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकच्या व्यवस्थापनावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
इमाने खलीफ आणि तैवानच्या लिन यू-टिंग या दोघांनाही लिंग चाचणीत अपयशी ठरल्याने गेल्या वर्षीच्या जागतिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले होते. परंतु असे असतानाही आयओसीने इमाने खलीफला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली. इमाने खलीफने पहिल्याच सामन्यात इटलीच्या अँजेला कारिनीचा पराभव केल्याने पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली.
5-0 ने एकतर्फी विजय-
उंच असणाऱ्या इमाने खलीफने ऑलिम्पिकच्या संपूर्ण स्पर्धेत तिच्या ताकदीचा वापर केला होता. अंतिम सामन्यात इमाने खलीफने माजी विश्वविजेत्या यांग लिऊविरुद्ध चमकदार कामगिरी केली. इमाने खलीफने रिंगच्या मधूनच अनेक दमदार पंच केले. या सामन्यात खलीफने 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. यापूर्वी देखील इमान खलीफने सर्व सामन्यांमध्ये एकतर्फी विजय मिळवला होता. दरम्यान, इमाने खलीफ खरंच महिला खेळाडू आहे की पुरुष? यावर मोठा वाद निर्माण झाला होता. बॉक्सिंगच्या झालेल्या सामन्यात एका बायोलॉजिकल पुरुष बॉक्सरचा सामना महिलेशी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने बंदी घातली होती-
इमाने खलीफाच्या लिंगावर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने 2023 मध्येही इमाने खलीफवर बंदी घातली आहे. तर दिल्लीतील बॉक्सिंग असोसिएशनने इमानेला जागतिक अजिंक्यपद सुवर्णपदकाच्या सामन्यात सहभागी होण्यास बंदी घातली होती.
लिंग विवादावर इमाने खलीफने काय म्हटलं?
तिच्या लिंग विवादावर इमाने खलीफने यापूर्वी म्हटले होते की, मी इतर महिलांप्रमाणेच एक स्त्री आहे. मी स्त्री म्हणून जन्माला आले, मी स्त्रीप्रमाणे जगते आणि मी पात्र आहे. पण काही लोक माझ्या यशाचे शत्रू आहेत आणि ते माझे यश पचवू शकत नाहीत, असं इमाने खलीफने म्हटलं होतं.