(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Team India's Next Captain: रोहित शर्मानंतर टीम इंडियाची धुरा कोण सांभाळणार? पार्थिव पटेलनं सुचवली चार नावं
Team India's Next Captain: टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलनं भविष्यात भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी चार खेळाडूंची नावं सुचवली आहेत.
Team India's Next Captain: टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेलनं (Parthiv Patel) भविष्यात भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी चार खेळाडूंची नावं सुचवली आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नंतर त्यानं केएल राहुल (KL Rahul), हार्दिक पंड्या (Hardik Pandya), ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा समावेश केलाय. या यादीत त्यानं जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) समावेश केलाय. जसप्रीत बुमराहमध्ये एका कर्णधारकडं असलेली सर्व गोष्टी आहेत, असंही पार्थिव पटेलनं म्हटलं आहे.
पार्थिव पटेल काय म्हणाला?
"रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि केएल राहुल भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असतील. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामात ट्रॉफी जिंकली. दबावातही हार्दिक पांड्या शांततेनं आणि योग्य पद्धातीनं खेळ पुढं घेऊन जातो. याचबरोबर ऋषभ पंत आणि केएल राहुलनं अनेकदा कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेतलीय. हे दोन्ही खेळाडू कर्णधार म्हणून अनुभवाच्या जोरावर चांगले होताना दिसतील."
जसप्रीत बुमराहबद्दल काय म्हणाला पार्थिव पटेल?
पार्थिव पटेल कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराहलाही पात्र मानतोय. "माझ्या नेतृत्वाखाली बुमराहनं गुजरातसाठी पदार्पण केलं होतं. फलंदाजाला जाळ्यात अडकवण्यासाठी बुमराह कशी गोलंदाजी करतो? हे देखील मला माहिती आहे. यावरून कळतं की, बुमराह मैदानावर किती अचूक निर्णय घेतो, हे पाहायला मिळतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं कसोटी गमावली असली तरी भविष्यात तो भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता ठेवतो."
एका वर्षात भारताचे सात कर्णधार बदलले
विराट कोहलीने टीम इंडियाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या हाती आहे. तो एक उत्तम कर्णधारही असल्याचं सिद्ध होत आहे. या एका वर्षात भारतीय संघाने इतर 5 कर्णधारांनाही आजमावले आहे. यामध्ये केएल राहुल, ऋषभ पंत, शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. कर्णधार म्हणूनही प्रत्येकाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. अशा स्थितीत रोहित शर्मानंतर भारताकडे भविष्यात भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी अनेक दावेदार असतील.
हे देखील वाचा-