On This Day: शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस खूप खास!
Sachin Tendulkar: आजच्या दिवशी (14 ऑगस्ट 1990) 32 वर्षापूर्वी सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं होतं.
Sachin Tendulkar First Test Century Team India: क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. आजच्या दिवशी (14 ऑगस्ट 1990) 32 वर्षापूर्वी सचिन तेंडुलकरनं त्याच्या कारकिर्दीतील पहिलं आंतरराष्ट्रीयशतक झळकावलं होतं. सचिनं 1990 साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद 119 धावांची खेळी केली होती. त्यानंतर सचिन तेंडुलकरनं त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 शतकांचा टप्पाही गाठला, जो आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला गाठता आला नाही.
सचिननं 15 नोव्हेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण कसोटी सामना खेळला. त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 1990 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला. या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघानं पहिल्या डावात 519 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 432 धावाच करू शकला. यानंतर इंग्लंडनं 320 धावा करताना 408 धावांचं लक्ष्य दिलं. यानंतर लक्षाचा पाठलाग करत भारताने 183 धावांवर 6 विकेट गमावल्या. अशा परिस्थितीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सचिननं नाबाद 119 धावांची खेळी केली. अखेरच्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात 6 विकेट्सवर 343 धावा करत सामना अनिर्णित ठेवला.
ट्वीट-
सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
क्रिकेट | सामना | डाव | धावा | सर्वोच्च घावसंख्या | सरासरी | स्ट्राईक रेट | शतक | अर्धशतक | चोकार | षटकार | झेल |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
कसोटी | 200 | 329 | 15921 | 248* | 53.78 | 51 | 68 | 69 | 115 | ||
एकदिवसीय | 463 | 452 | 18426 | 200* | 44.83 | 86.23 | 49 | 96 | 2016 | 195 | 140 |
टी-20 | 1 | 1 | 10 | 10 | 10.00 | 83.33 | 0 | 0 | 2 | 0 | 1 |
सचिन तेंडुलकरनं भारतासाठी एकूण 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि एकमवे टी-20 सामना खेळला आहे. सचिननं कसोटी क्रिकेटमध्ये 53.78 च्या सरासरीनं 15 हजार 921 धावा केल्या आहेत. ज्यात 68 शतक आणि 51 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं 18 हजार 426 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 49 शतक आणि 96 अर्धशतकांची नोंद आहे. तसेच दक्षिण आफ्रिकाविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकमेक टी-20 सामन्यात तो 10 धावा करून बाद झाला.
हे देखील वाचा-