IND vs ZIM ODI Series: टीम इंडियाचं झिम्बाब्वे दौऱ्यातील आतापर्यंतचं प्रदर्शन, किती सामने जिंकले?
इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमीत पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
India Tour Of Zimbabwe: इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच मायभूमीत पराभवाची धुळ चारल्यानंतर भारतीय संघ आता झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेला येत्या 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं या एकदिवसीय मालिकेत भारताचा सलामीवीर केल राहुल (KL Rahul) संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात भारतानं आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली? हे पाहुयात.
झिम्बाब्वे दौऱ्यात भारताच्या युवा खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आलाय. झिम्बाब्वे विरुद्ध भारताचे आतापर्यंतचे आकडे चांगले आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यात भारतानं आतापर्यंत फक्त 4 सामने गमावले आहेत. यंदाही भारताचं पारडं जड दिसत आहे. तसेच भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी झिम्बाव्वेच्या संघाला खूप मेहनत करावी लागणार आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यात भारताची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी
झिम्बाब्वे दौऱ्यात भारतानं आतापर्यंत चागलं प्रदर्शन करून दाखवलंय. झिम्बाब्वे दौऱ्यात भारतानं 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारतानं 19 सामने जिंकले आहेत. तर, 4 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. भारतीय संघ बऱ्याच वर्षानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलाय. भारतानं झिम्बाब्वेविरुद्ध 2016 मध्ये अखेरची एकदिवसीय मालिका खेळलीय. त्यावेळी खेळण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं 3-0 असा विजय मिळवला होता. भारतानं पहिला सामना 9 विकेट्स आणि दुसरा सामना 8 विकेट्सनं जिंकला होता. तर, तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला 10 विकेट्सनं पराभूत केलं होतं.
झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा पहिला एकदिवसीय सामना
भारतीय संघानं झिम्बाब्वेमध्ये ऑक्टोबर 1992 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला होता. या सामन्यात भारतानं 30 धावांनी विजय मिळवला होता. यानंतर 1997 मध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन सामन्यांची एकदिवसीय मिलाक खेळली गेली. यातील एका सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागलाय. तर दुसरा सामना रद्द झाला होता.
भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा , मोहम्मद सिराज, दीपक चहर.
झिम्बाब्वेचा संघ:
रेगिस चकाब्वा (कर्णधार), तनाका चिवांगा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जोंगवे, रायन बर्ल, इनोसंट कैया, कैटानो ताकुडझ्वानाशे, क्लाइव्ह मदांडे, वेस्ले मधेवेरे, तादिवानाशे मारुमणी, जॉन मसारा, टोनी मुन्योंगा, रिक्टर न्कानझावा, विक्टर न्गार्वा, रिक्टर न्गारू , मिल्टन शुम्बा, डोनाल्ड टिरिपानो.
हे देखील वाचा-