IND vs NZ 3rd T20: पृथ्वीचं बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन, पण प्लेईंग 11 मध्ये जागाच नाही; नाराज चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
Prithi Shaw : युवा सलामीवीर पृथ्वी शॉ न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या T20 सामन्यात देखील प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता, ज्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते.
Team India : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. सामना भारतानं 168 धावांनी जिंकत मालिकाही जिंकली, पण यानंतर ही युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचे फॅन्स मात्र नाराज झाले होते. कारण बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन होऊन देखील पृथ्वीला प्लेईंग 11 मध्ये अखेरपर्यंत संधी मिळाली नव्हती. ज्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांची नाराजी दिसून येत होती.
सोशल मीडियावर चाहत्यांचा धुमाकूळ
पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान न मिळाल्याने चाहते सातत्याने संताप व्यक्त करत आहेत. खरं तर, बऱ्याच काळानंतर पृथ्वी शॉ न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात परतला. तो बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. पण या मालिकेत संघात येऊनही तिन्ही सामन्यांत त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. याआधी पृथ्वी शॉला रांची आणि लखनौ टी-20 सामन्यातही बेंचवर बसावे लागले होते. तर या सर्वानंतर भडकलेल्या चाहत्यांनी काही पोस्ट शेअर केल्या त्या पाहूया...
Prithvi Shaw was selected in team India for this T20I series against New Zealand after almost 2 years but he could not get a chance in the playing XI. Feel for him, hope he get chance in the coming times.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) February 1, 2023
Thank god Prithvi Shaw hasn't hired a PR agency like Sanju Samson for justice trends and spreading fake stats 😭😭
— Shruti 🦋 (@meandmyself017) February 1, 2023
Feel for Prithvi Shaw - got selected after a long for the 3 match T20i series, but unfortunately couldn't get a chance in any of the matches.
— Harshwardhan Singh 🇮🇳 (@Harshwardhan__8) February 1, 2023
It's Not Easy to being Prithvi Shaw 💔#PrithviShaw #INDvsNZ #3rdT20i #ishanKishan #SubhamanGill #HardikPandya𓃵 pic.twitter.com/QXectBXRrD
#INDVsNZT20 The wait continues for Prithvi Shaw as he continues to get benched for the 3rd T20I.#INDvsNZ #PrithviShaw pic.twitter.com/vnxphHjfrX
— Abhishek Tiwari (Journalist) (@abhishek_awaaz) February 1, 2023
Heartbreaking wait continues for Prithvi Shaw 💔💔
— Avinashsinh Barad 🇮🇳🇮🇳 (@BaradAvinash) February 1, 2023
What are you doing BCCI @BCCI Management & Hardik Pandya @hardikpandya7
Just destroy talented cricketers..
Need to take care of them.
Abomination
Nonsense 😡#PrithviShaw pic.twitter.com/jKQAtyq1lj
This man "prithvi shaw" deserves a chance in playing 11 for today's match...
— 🆁🅿 17 ☆ 𝒜𝐵𝐻𝐼𝒩𝒜𝒩𝐼 ☆ (@ABHINANI1709) February 1, 2023
NO worries champ give them a strong reply in ipl 2023 by your performance.....❣️💪👍 pic.twitter.com/vXG7pk9L2X
Ex-India men's U19 captain Prithvi Shaw ignored this series to show women's U19 players that they still have a long way to go despite title win. Deep message. ♥️
— Silly Point (@FarziCricketer) February 1, 2023
26 महिन्यांनंतर संघात परतला होती पृथ्वी
पृथ्वी शॉ 26 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात परतला. या काळात पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. पण त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळत नव्हते. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये शॉने आसामविरुद्ध 379 धावांची विक्रमी खेळी खेळली आणि निवडकर्त्यांना टीम इंडियामध्ये स्थान देण्यास भाग पाडले. रणजी ट्रॉफीपूर्वी पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही सर्वाधिक धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :