PAK vs NZ: सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान-न्यूझीलंड मालिका रद्द, आज होणार होता पहिला एकदिवसीय सामना
PAK vs NZ: न्यूझीलंडने पाकिस्तानचा दौरा रद्द केला, पहिला एकदिवसीय सामना आज होणार होता.
![PAK vs NZ: सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान-न्यूझीलंड मालिका रद्द, आज होणार होता पहिला एकदिवसीय सामना PAK vs NZ: New Zealands tour of Pakistan canceled, the first ODI was to be played today PAK vs NZ: सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान-न्यूझीलंड मालिका रद्द, आज होणार होता पहिला एकदिवसीय सामना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/17/c0e12cbb4776e028ba7de1ca94db5ca0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pakistan vs New Zealand: तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आजपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार होता. पण सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. 18 वर्षानंतर न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात न्यूझीलंडला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळायची होती.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका आजपासून सुरू होणार होती. पण सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संपूर्ण पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी -20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे की ही मालिका नंतर खेळली जाईल आणि ती तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.
न्यूझीलंडने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानचा सध्याचा दौरा रद्द केला आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे (NZC) मुख्य कार्यकारी डेव्हिड व्हाइट (David White) म्हणाले की, त्यांना मिळालेला सल्ला पाहता दौरा सुरू ठेवणे शक्य नाही. ते म्हणाले, "मला माहितीय यजमान असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी हा धक्का असेल. पण खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा एकमेव जबाबदार पर्याय आहे."
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "पाच सामन्यांच्या टी -20 मालिकेसाठी लाहोरला जाण्यापूर्वी आजपासून आम्हाला पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची होती. मात्र, न्यूझीलंड सरकारकडून आम्ही पाकिस्तानमधील धोक्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर, सुरक्षा सल्लागारांशी सल्लामसलत केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला आहे की किवी संघ हा दौरा चालू ठेवणार नाही. आता संघाच्या परत येण्याची व्यवस्था केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)