(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022: चेतन सकारियासह तीन स्टार गोलंदाज ऑस्ट्रेलियात दाखल; टी-20 विश्वचषकात बजावतील महत्वाची भूमिका
ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचलाय.
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबरपासून आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचलाय. यातच भारताचे युवा गोलंदाज चेतन सकारिया (Chetan Sakariya), मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) आणि सौरभ कुमार (Saurabh Kumar) ऑस्ट्रेलियात दाखल झाल्याची माहिती समोर आलीय. हे तिघही टी-20 विश्वचषकात महत्वाची भूमिका बजावणार असून त्यांचा नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आलाय.
1) चेतन सकारिया
सौराष्ट्राचा डावखुरा गोलंदाज चेतन सकारियाची भारताच्या टी-20 विश्वचषक संघात नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आलीय. चेतन सकारियानं आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केलीय. तसेच त्याला ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर अनेक सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यानं केएफसी टी-20 लीगमध्ये सनशाईन कोस्टच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय, ज्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो.
2) मुकेश चौधरी
मुकेश चौधरी हा भारतीय संघातील दुसरा नेट गोलंदाज आहे. मुकेश चौधरीला ऑस्ट्रेलियातील टी-20 मॅक्स सिरीजमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्याला ऑस्ट्रेलियातील खेळपट्टीचा चांगली माहिती आहे. अलीकडच्या काळात भारतीय संघ डावखुऱ्या गोलंदाजासमोर संघर्ष करताना दिसलाय. अशात सकारिया आणि मुकेश चौधरी यांच्यामुळं भारतीय संघाला आपल्या चुकांमध्ये सुधारणा करण्यास मदत मिळू शकते. आयपीएलच्या मागच्या हंगामात मुकेश चौधरीनं महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधित्व केलंय. या हंगामात मुकेशनं दमदार गोलंदाजी केली . आयपीएलच्या 13 सामन्यात त्यानं 16 विकेट्स घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
3) सौरभ कुमार
उत्तर प्रदेशचा गोलंदाज स्पिनर सौरभ कुमारनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केलीय. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 52 सामन्यात 222 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामुळं त्याच्यावर भारताच्या टी-20 विश्वचषकाच्या नेट गोलंदाजाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. चेतन सकारिया आणि सौरभ कुमार यांची उमरान मलिक आणि कुलदीप सेन यांच्या जागी टी-20 विश्वचषकासाठी नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.
ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषकातील सामने
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-