(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL, 2nd ODI, Pitch Report : ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आजची लढत, कशी असेल मैदानाची स्थिती? जाणून घ्या पिच रिपोर्ट
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.
India vs Sri lanka, 3rd ODI : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील अखेरचा सामना आज खेळवला जात आहे. आजचा हा तिसरा एकदिवसीय सामना तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने 67 धावांनी तर दुसरा सामना 4 विकेट्सनी जिंकला असून आता हा तिसरा सामना जिंकून भारत श्रीलंकेला व्हाईट वॉश देणार आहे. पण श्रीलंका देखील मालिकेतील आणि त्यांच्या यंदाच्या भारत दौऱ्यातील अखेरचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे निर्णायक नसला तरी दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या या सामन्यात ग्रीनफिडन इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी (Pitch Report) कशी आहे अर्थात पिच रिपोर्ट जाणून घेऊ...
तिरुवनंतीपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांपेक्षा गोलंदाजांसाठी अधिक अनुकूल आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाजांना धावा करणं कठीण होऊ शकते. आतापर्यंतची आकडेवारी दाखवून देते की ही विकेट स्पिनर आणि वेगवान गोलंदाज दोघांनाही मदत करते. त्यामुळे आजच्या सामन्यात या खेळपट्टीवर नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान दोन्ही संघात दमदार फलंदाजही असल्याने आज या विकेटवर बॅट आणि बॉलमधील रोमांचक लढत पाहायला मिळेल हे नक्की!
भारताला श्रीलेकला व्हाईट वॉश देण्याची नामी संधी
भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना 67 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही 4 गडी राखून विजय मिळवत भारताने एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेत मालिकाही नावावर केली. त्यामुळे आजचा हा तिसरा सामना जिंकल्यास भारत श्रीलंकेला व्हाईट वॉश अर्थात क्लिन स्विप देऊ शकतो.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
श्रीलंका- दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.
हे देखील वाचा-