एक्स्प्लोर

मैच

Sarfaraz Khan : फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 80+ ची सरासरी, तरी सरफराजला टीम इंडियामध्ये संधी नाही, सोशल मीडियावर नाराजी

IND vs AUS : मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन वर्षांपासून दमदार फलंदाजी करणाऱ्या सरफराज खानला यावेळीही भारतीय कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही.

IND vs AUS, Test Team : ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान बीसीसआयनं (BCCI) निवडलेल्या या संघात मुंबईचा फलंदाज सरफराज खानने (Sarfaraz Khan) याला संधी न मिळाल्याने बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली जात आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो गेल्या तीन हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 80+ आहे.

सरफराज खानने आतापर्यंत 36 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 52 डावांमध्ये 3380 धावा केल्या आहेत. येथे त्याची फलंदाजीची सरासरी 80.47 आहे. यादरम्यान त्याने एकूण 12 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने एक त्रिशतकही ठोकले आहे. गेल्या तीन हंगामापासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येतच आहेत. त्याने 2019-20 मध्ये 155 च्या सरासरीने 928 धावा केल्या. यानंतर, 2021-22 मध्ये, त्याने पुन्हा एकदा 123 च्या सरासरीने 900 हून अधिक धावा केल्या. 2022-23 च्या मोसमातही तो दमदार खेळी करत आहे

दरम्यान या 25 वर्षीय युवा फलंदाजाची ही अप्रतिम कामगिरी पाहून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडिया त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही, अशी आशा सर्वांना वाटत होती. यापूर्वी असेही बोलले जात होते की, खानला बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत नक्कीच संधी मिळेल, पण त्या मालिकेत संधी न मिळालेल्या सरफराजला आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही संधी न मिळाल्याने फॅन्स आणि क्रिकेट तज्ज्ञही नाराज झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव

हे देखील वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar - Sanjay Raut : काँग्रेसची नाराजी; 'मैत्रीपूर्ण'साठी राजी ?Harshwardhan Patil : प्रत्येक पक्षाने युती धर्म पाळलाच पाहिजे - हर्षवर्धन पाटीलMahayuti : ठाण्यात हेमंत गोडसेंची श्रीकांत शिंदेंसोबत चर्चा , महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा कायमABP Majha Headlines :  06 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
'साक्षी भाभीनंतर मी एकच असा व्यक्ती...'; भर कार्यक्रमात एमएस धोनीसमोर जाडेजा हे काय बोलून गेला!
Sharad Ponkshe : कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
कोणत्या मतदारसंघातून लोकसभा लढवायला आवडेल? शरद पोंक्षेंचं रोखठोक वक्तव्य!
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Embed widget