Womens T20 Asia Cup : भारताच्या विजयाची शिल्पकार जेमिमाचा वर्ल्ड रेकॉर्ड, आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात रचला इतिहास
India Women vs Sri Lanka Women : जेमिमा रॉड्रीग्जने आशिया कप 2022 स्पर्धेत श्रीलंका संघाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं असून यासोबतच एक खास रेकॉर्ड केला आहे.
Jemimah Rodrigues world record : पुरुष आशिया चषकानंतर आजपासून महिला टी20 आशिया चषक 2022 (Womens Asia Cup 2022) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सलामीचा सामना भारताने 41 धावांच्या फरकाने जिंकला. यावेळी भारतासाठी जेमिमा रॉड्रीग्जने (Jemimah Rodrigues) 76 धावांची तुफान खेळी करत विजयात मोठा वाटा उचलला. विशेष म्हणजे जेमिमाने याचवेळी एक वर्ल्ड रेकॉर्डही केला. जेमिमा महिला आशिया कप स्पर्धेच्या सामन्यातील एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
सामन्यात (India Women vs Sri Lanka Women) भारताने प्रथम फलंदाजी करत 150 धावा केल्या. ज्यानंतर श्रीलंकेसमोर 151 धावांचे आव्हान असताना श्रीलंका संघाला भारताने 18.2 षटकात 109 धावांवर सर्वबाद करत सामना जिंकला. भारताकडून जेमिमाने 53 चेंडूत 76 रन केले. यावेळी तिने 11 चौकार आणि एक षटकार ठोकला. यामुळे ती आशिया कप स्पर्धेच्या एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. यामध्ये पहिल्या स्थानावर माजी भारतीय क्रिकेटर मिताली राज (Mithali Raj) नाबाद 97 धावांसह विराजमाना आहे. तिने 2018 मध्ये मलेशियाविरुद्ध ही कमाल केली होती.
महिला टी20 आशिया कपमध्ये सर्वोच्च स्कोर :
खेळाडू | धावा | सामना |
मिताली राज | नाबाद 97 | भारत विरुद्ध मलेशिया |
जेमिमा रॉड्रीग्ज | 76 | भारत विरुद्ध श्रीलंका |
मिताली राज | नाबाद 73 | भारत विरुद्ध पाकिस्तान |
मिताली राज | 62 | भारत विरुद्ध श्रीलंका |
बिस्माह मारूफ | 62 | पाकिस्तान विरुद्ध मलेशिया |
हे देखील वाचा-