एक्स्प्लोर

T20 World Cup 2024:आयरलँडच्या कोचचं भलतं धाडस, रोहित शर्माच्या टीमला चॅलेंज, आम्ही भल्या भल्यांना....

T20 WC 2024 Match 8 IND vs IRE: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज भारताची पहिली मॅच होणार आहे. भारत आणि आयरलँड आज न्यूयॉर्कमध्ये आमने सामने येणार आहेत.  

T20 World Cup 2024, IND vs IRE न्यूयॉर्क : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये आज भारत आणि आयरलँड आमने सामने येणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8 वाजता दोन्ही संघ आमने सामने येतील. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही संघाची आज ही पहिली मॅच आहे. भारतीय संघ टी20 वर्ल्ड कपची सुरुवात विजयानं करण्याच्या प्रयत्ना असेल. दुसरीकडे आयरलँडचे प्रशिक्षक हेनरिक मलान यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भारतीय संघाला आयरलँडच्या प्रशिक्षकांनी मोठं आव्हान दिलं आहे. आमच्या संघात मोठे उलटफेर करण्याची क्षमता आहे, असं देखील हेनरिक मलान यांनी म्हटलं.  

हेनरिक मलान भारताविरुद्धची रणनीती सांगितली रणनीती  

आयरलँडचे कोच हेनरिक मलान यांनी म्हटलं की,"टी20 वर्ल्ड कपची तयारी करण्यासाठी आम्हाला चांगली संधी मिळाली आहे. आम्हाला ज्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज  आहे, त्याची सुधारणा करणार आहोत. भारत एक अनुभवी टीम आहे, ज्यांच्या विरोधात मोठी रणनीती तयार करण्याची आणि माहिती मिळवण्याची गरज असल्याचं मलान म्हणाले. आम्ही भारताच्या कमजोर बाबी शोधून काढू ज्याचा आम्हाला फायदा होईल, असं मलान म्हणाले.  

मलान यांनी पुढं म्हटलं की, टी20 वर्ल्ड कपमध्ये सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही फक्त वर्ल्ड कप, भारताविराधात किंवा इतर मोठ्या संघाविरुद्ध चांगलं खेळण्याचा प्रयत्न करत नाही तर चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी एक यंत्रणा आणि रचना निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळं आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकू, असं हेनरिक मलान यांनी म्हटलं. आम्ही त्यानुसार कामगिरी करु, अशी आशा असल्याचं मलान यांनी म्हटलं आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकतो, मोठ्या संघांना पराभूत करु शकतो, आमच्या खेळाचा तो एक भाग बनेल, असं मलान म्हणाले.   

आयरलँडनं यापूर्वी दिलेत मोठे धक्के

आयरलँडकडे मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता आहे. अलीकडच्या काळात आयरलँडनं अफगाणिस्ताना, बांगलादेश  आणि पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या मालिकेत विजय मिळवला होता. मात्र, त्यांना मालिकेत विजय मिळवण्यात अपयश आलं होतं. भारत आणि आयरलँड टी20 मॅचमध्ये यापूर्वी 8 वेळा आमने सामने आले होते. भारताला त्यापैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळाला होता. तर, एक मॅच रद्द झाली होती.  

संभाव्य प्लेईंग इलेव्हन 

भारत: रोहित शर्मा (कॅप्टन), रिषभ पंत (विकेटकीपर), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

आयरलँड: लोरकन टकर (विकेटकीपर), एंडी बालबर्नी, हॅरी टेक्टर, मरेयर एडायर, पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), गेरेथ डेलाने, जॉर्ज डॉकरेल, कर्टिस कैम्फर, बैरी व्हाइट, जोशुआ लिटिल, क्रेग यंग.

संबंधित बातम्या :

T20 World Cup 2024 IND vs IRE: आज आयर्लंडविरुद्ध भारताचा सामना; रोहित-कोहली सलामीला येणार?, कशी असेल Playing XI, पाहा

 SL vs SA: दक्षिण आफ्रिकेचा धमाका,पहिल्याच मॅचमध्ये  श्रीलंकेला दणका, सहा विकेटनं दणदणीत विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget