T20 World Cup 2024 IND vs IRE: आज आयर्लंडविरुद्ध भारताचा सामना; रोहित-कोहली सलामीला येणार?, कशी असेल Playing XI, पाहा
T20 World Cup 2024 IND vs IRE: दोन्ही यष्टीरक्षक म्हणजेच ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना आयर्लंडविरुद्ध संधी मिळू शकते.
ICC T-20 World Cup 2024: भारतीय संघ टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup) चा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.हा सामना आज न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. हा सामना स्थानिक म्हणजेच न्यूयॉर्कच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता सुरू होईल, तर भारतात हा सामना रात्री 8 वाजल्यापासून पाहायला मिळेल. या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इल्वेहन कशी असेल, याबाबत उस्तुकता लागली आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत विराट कोहली सलामीला येऊ शकतो. यशस्वी जैस्वाल संघात मुख्य सलामीवीर म्हणून खेळत असला तरी, विराट कोहलीला संधी दिली जाऊ शकते. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात संजू सॅमसन रोहित शर्मासोबत सलामीला मैदानात उतरला होता.
दोन्ही यष्टिरक्षकांना संधी मिळू शकते-
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये, दोन्ही यष्टीरक्षक म्हणजेच ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना आयर्लंडविरुद्ध संधी मिळू शकते. ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर, तर संजू सॅमसनला पाचव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगसह हार्दिक पांड्या तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून संघात असेल. अशा स्थितीत रोहित शर्माला तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरवण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल हे प्रमुख फिरकीपटू असू शकतात आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून तिसरा फिरकी गोलंदाज संघात असेल.
आयर्लंडविरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
All in readiness 🔥🔥
— BCCI (@BCCI) June 4, 2024
Match day loading ⏳#TeamIndia | #T20WorldCup | #INDvIRE pic.twitter.com/rwIYfcpXOk
विराट कोहलीच्या आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा-
विराट कोहली आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आयपीएल 2024 च्या 15 सामन्यांमध्ये 154.70 च्या स्ट्राइक रेटने 741 धावा केल्या, ज्यामध्ये पाच अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे. आयपीएलच्या या मोसमातील कोहलीची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे 11 नाबाद धावा, त्याने 62 चौकार आणि 38 षटकार ठोकले.
टी-20 विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार-
वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचं मोफत प्रसारन मोबाईलवर पाहाता येणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणारा टी20 विश्वचषकात भारतीयांना मोफत पाहता येणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर विश्वचषकाचा थरार मोफत पाहता येणार आहे. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन घेण्याची गरज नाही. डिज्नी प्लस हॉटस्टार सामन्याचं लाईव्ह प्रसारण पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टी20 विश्वचषक 2024 चा ऑफिशियल ब्रॉडकास्टर आहे. त्याशिवाय या स्पर्धेतील सामन्याचं लाईव्ह प्रसारण डिज्नी प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅप मोफत पाहता येणार आहे. 2023 वनडे विश्वचषकाचेही मोफत प्रसारण करण्यात आले होते.