IndW vs SLW, 1st ODI : भारतीय महिलांची श्रीलंकेवर चार विकेट्सनी मात; मालिकेत घेतली 1-0 ची आघाडी
SL vs IND: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही 1-0 ने आघाडी घेतली आहे.
SL vs IND : भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघामध्ये सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना नुकताच पार पडला. या सामन्यात भारतीय महिलांनी श्रीलंकेला 4 विकेट्सने मात देत विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आधी टी20 मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठीही भारतीय महिला सज्ज झाल्या आहेत.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक पार पडली. श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. पण भारतीय महिलांनी भेदक गोलंदाजी करत 48.2 षटकात 171 धावांवर श्रीलंकेच्या महिलांना सर्वबाद केलं. श्रीलंकेकडून निलाक्षी डि सिल्वा हिने केवळ 48 धावांची एकहाती झुंज दिली. इतर फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. भारताकडून दिप्ती शर्मा आणि रेणुका सिंह यांनी अप्रतिम गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. पुजा वस्त्रकरने 2 तर राजेशव्री गायकवाड आणि हरमनप्रीत कोर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
12 षटकं राखून भारत विजयी
172 धावांच आव्हान पूर्ण करण्यासाठी आलेल्या भारतीय महिलांनी 12 षटकं ठेवून हे आव्हान पूर्ण केलं. 6 विकेट्सच्या बदल्यात हे लक्ष्य गाठल्याने भारताचा 4 विकेट्सने विजय झाला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर शेफाली शर्माने 35 धावांची तर हरलीन देवोलने 34 धावांटी महत्त्वपूर्ण खेळी केली. पुजा (21) आणि दिप्ती (22) यांनी फिनिंशीग देत सामना भारताला जिंकवून दिला. श्रीलंकेकडून इनोका रणवीराने महत्त्वपूर्ण कामगिरी करत चार महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. पण भारताने सामना जिंकल्यामुळे तिची ही झुंज व्यर्थ गेली.
टी20 मालिकेत विजय
डंबुलाच्या रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतानं श्रीलंकेवर 34 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय महिला संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून श्रीलंकेसमोर 138 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 20 षटकात 104 धावा करू शकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघानं श्रीलंकेचा पाच विकेट्सनं पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघान टी-20 मालिकेवर 2-0 नं कब्जा केला. दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 126 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं पाच विकेट्स राखून सामना जिंकला. तिसरा सामना मात्र श्रीलंकेने जिंकला होता. या सामन्यात सर्वात आधी भारतीय महिलांना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला. 20 षटकात 138 धावाच स्कोरबोर्डवर लागल्या. या धावा श्रीलंकेनं चामिरा अथूपट्टूच्या दमदार नाबाद 80 धावा केल्या. तिच्याच जोरावर संघानं 17 षटकात तीन गडी गमावत विजय मिळवला.
हे देखील वाचा-
- VIDEO : क्रिकेटर्सवर 'पुष्पा फिवर' कायम, सरावादरम्यान विराटने केलेली अॅक्शन पाहिलीत का?
- IND vs ENG 5th Test : अँडरसन-ब्रॉड जोडी भारतीय फलंदाजाविरुद्ध मैदानात उतरणार, इंग्लंडने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी
- Jasprit Bumrah Captain : बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार