VIDEO : क्रिकेटर्सवर 'पुष्पा फिवर' कायम, सरावादरम्यान विराटने केलेली अॅक्शन पाहिलीत का?
India vs England : इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ सध्या कसोटी सामना खेळत आहे. पण या सामन्यापूर्वी सराव करताना भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा पुष्पा अवतार दिसून आला.
Virat Kohli in India vs England 5th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील एजबेस्टनमध्ये (edgbaston test) पाचवा कसोटी सामना खेळवला जात आहे. यासामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत असून बऱ्याच काळानंतर विराट कोहलीसह अनेक भारतीय दिग्गज मैदानात उतरले आहेत. यावेळी विराटच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. पण सामन्यापूर्वी हाच भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास पुष्पा अवतारात दिसून आला.
विराट कोहलीने सामन्यापूर्वी सरावादरम्यान प्रसिद्ध दाक्षिणात्य सिनेमा पुष्पामधील स्टाईल मारल्याचं दिसून आलं. यावेळी तो फलंदाजीची प्रक्टिस करत असताना त्याच्यासोबत शुभमन गिल दिसत आहे. गिललाच तो ही पुष्पा चित्रपटातील हिरोप्रमाणे स्टाईल करुन दाखवत होता. तर पुष्पा हा सुपरस्टार अल्लू अर्जून याचा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. संपूर्ण देशभरात सिनेमाने धुमाकूळ घातला असताना अनेक क्रिकेटर्सनी या सिनेमातील हिरोच्या स्टाईलची कॉपी केली होती. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर, भारताचा स्टार अष्टुपैलू रवींद्र जाडेजा यांचा समावेश होता. त्यानंतर आता विराटनेही हीच स्टाईल मारल्याचं दिसून आलं.
पाहा व्हिडीओ-
Match Day 😎🔥#INDvsENG #ViratKohli𓃵 pic.twitter.com/ACcI7TRn5Q
— Troll RCB Haters (@Troll_RCBHaters) July 1, 2022
भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर
सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून यावेळी एकमेव कसोटी सामना खेळवता जात आहे. मूळात हा सामना भारताच्या मागील वर्षीच्या दौऱ्यातील सामना आहे. 2021 मध्ये भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत असताना कोरोनाच्या शिरकावामुळे अखेरचा सामना खेळवता आला नव्हता. हात अखेरचा उर्वरीत कसोटी सामना आता खेळवला जात आहे. याआधी झालेल्या 4 सामन्यातील दोन सामने भारताने जिंकले तर एक इंग्लंडने जिंकत, एक सामना अनिर्णीत सुटला होता.त्यामुळे भारत 2-1 च्या फरकाने पुढे असून आताचा सामना जिंकल्यास मालिकाही जिंकेल, पण सामना इंग्लंडने जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटेल.
हे देखील वाचा-
- IND vs ENG 5th Test : अँडरसन-ब्रॉड जोडी भारतीय फलंदाजाविरुद्ध मैदानात उतरणार, इंग्लंडने नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी
- Jasprit Bumrah Captain : बुमराहच्या हाती टीम इंडियाची धुरा; इंग्लंडविरुद्ध कसोटीत कर्णधार म्हणून वर्णी, पंत उपकर्णधार
- Ind vs Eng, 5th Test : इंग्लिश फोटोग्राफरनं मानले विराट कोहलीसह बीसीसीआयचे आभार, काय आहे नेमकं कारण?