(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND W vs SL W: त्यांच्यात देशात जाऊन त्यांनाचं 3-0 नं नमवलं! श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत महिलांची धडाकेबाज कामगिरी
India Women tour of Sri Lanka 2022: श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघानं धडाकेबाज कामगिरी करून दाखवली आहे.
India Women tour of Sri Lanka 2022: श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला संघानं धडाकेबाज कामगिरी करून दाखवली आहे. या दौऱ्यात भारतानं श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतानं 3-0 नं विजय मिळवून श्रीलंकेच्या संघाला त्यांच्याच देशात नमवलं आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात दीप्ती शर्माची अष्टपैलू चमकदार कामगिरी
भारतीय महिला संघ आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात पल्लेकेलेच्या पल्लेकेले आतंरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं भारतासमोर 172 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात दीप्ती शर्माची (25 धावांत 3 विकेट्स 22 धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (63 चेंडूंत 44 धावा) संयमी खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघानं 12 षटके राखून पहिला एकदिवसीय सामना जिंकला
स्मृती, शफालीमुळे भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर मात
भारत आणि श्रीलंका यांच्यात 5 जुलै रोजी दुसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात श्रीलंकेने दिलेले 174 धावांचं लक्ष्य भारतानं 25.4 षटकांत आणि 10 विकेट्स राखून पूर्ण केलं. भारताकडून स्मृती मानधना (नाबाद 94 धावा) आणि शफाली वर्मा (नाबाद 71) या सलामीच्या जोडीनं आक्रमक फलंदाजी केली.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 39 धावांनी विजय
भारतीय महिला संघानं गुरुवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात निर्धारित 50 षटकांत 9 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीतनं 88 चेंडूत 75 धावांची खेळी केली. ज्यात सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. तर, पूजा वस्त्राकरनं 65 चेंडूत 56 धावा ठोकल्या. याशिवाय, शेफाली वर्मा 50 आणि यास्तिका भाटियानं 30 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या संघाल 216 धावांवर रोखलं.
हे देखील वाचा-