एक्स्प्लोर

ENG vs IND 1st T20: हार्दिकचं दमदार प्रदर्शन, इंग्लंडच्या नाकी नऊ! भारताचा 50 धावांनी विजय

ENG vs IND 1st T20: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतानं इंग्लंविरुद्ध पहिला टी-20 सामना 50 धावांनी जिंकला.

ENG vs IND 1st T20: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दमदार प्रदर्शनाच्या जोरावर भारतानं इंग्लंविरुद्ध पहिला टी-20 सामना 50 धावांनी जिंकला. साउथॅम्प्टनच्या (Southampton) द रोज बाऊल स्टेडियमवर  (Rose Bowl) खेळण्यात आलेल्या या सामन्यात हार्दिकनं फलंदाजीसह गोलंदाजीनंही (51 धावा, 4 विकेट्स) कमाल दाखवलीय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतानं इंग्लंडसमोर 20 षटकात 8 विकेट्स गमावून 199 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्यु्त्तरात इंग्लंडच्या संघाला 148 धावापर्यंत मजल मारता आली. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 

भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. इंग्लंडच्या डावातील पहिल्याच षटकात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं आक्रमक फलंदाज जोस बटलरला शून्यावर बाद करून माघारी घाडलं. दरम्यान, युवा गोलंदाज अर्शदीप सिंहनं त्याच्या कारकिर्दीतील पहिलं षटक निर्धाव फेकून इंग्लंडवर दबाव टाकाला. त्यानंतर हार्दिक पांड्यानं जेसन रॉय, डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करनला आपल्या जाळ्यात अडकवत सामना भारताच्या बाजूनं झुकवला. दरम्यान, इंग्लडचा संघ 20 षटकात 148 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून मोईन अलीनं सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, युजवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंहनं प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, हर्षल पटेलला एक विकेट्स मिळाली. 

साउथॅम्प्टनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (14 चेंडू 24 धावा) आणि युवा फलंदाज ईशान किशन (10 चेंडू 8 धावा) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर दीपक हुडा आणि सुर्यकुमार यादवनं संघाच डाव सावरला. परंतु, 17 चेंडूत 33 धावांची छोटीशी वादळी खेळी करत दीपक हुडा आऊट झाला. त्यानंतर 11.4 षटकार सुर्यकुमारही (19 चेंडूत 39 धावा) बाद झाला. दीपक हुडा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यानं चांगली खेळी केली.परंतु, सतराव्या षटकात अक्षर पटेलच्या रुपात भारताला पाचवा धक्का लागला. त्यानंतर अठराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिकही आऊट झाला.  त्यानं 33 चेंडूत 51 धावा केल्या. दरम्यान, भारतानं इंग्लंडसमोर षटकात 8 विकेट्स गमावून धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनला प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाल्या. तर, रीस टोपले, मॅथ्यू पार्किन्सन आणि टायमल मिल्स यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
Auqib Nabi Profile : वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी
वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, मित्राने बनवलं भारताचा स्टार; आकिब नबीची काळजाला भिडणारी कहाणी

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘ॲनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Embed widget