ENG vs IND 1st T20: हार्दिक पांड्याचं अर्धशतक, भारताचं इंग्लंडसमोर 199 धावांचं लक्ष्य!
ENG vs IND 1st T20: मधल्या फळीतील फलंदाजाच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतानं इंग्लंडच्या संघासमोर 20 षटकात 199 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
ENG vs IND 1st T20: मधल्या फळीतील फलंदाजाच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारतानं इंग्लंडच्या संघासमोर 20 षटकात 199 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून रोहित शर्मानं (Rohit Sharma) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशनला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, दीपक हुडा (Deepak Hooda), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) भारताचा डाव सावरला. इंग्लंडकडून मोईन अली (Moeen Ali) आणि ख्रिस जॉर्डननं (Chris Jordan) चांगली गोलंदाजी केली.
साउथॅम्प्टनच्या द रोज बाऊल स्टेडियमवर सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा (14 चेंडू 24 धावा) आणि युवा फलंदाज ईशान किशन (10 चेंडू 8 धावा) स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर दीपक हुडा आणि सुर्यकुमार यादवनं संघाच डाव सावरला. परंतु, 17 चेंडूत 33 धावांची छोटीशी वादळी खेळी करत दीपक हुडा आऊट झाला. त्यानंतर 11.4 षटकार सुर्यकुमारही (19 चेंडूत 39 धावा) बाद झाला. दीपक हुडा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्यानं चांगली खेळी केली.परंतु, सतराव्या षटकात अक्षर पटेलच्या रुपात भारताला पाचवा धक्का लागला. त्यानंतर अठराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर हार्दिकही आऊट झाला. त्यानं 33 चेंडूत 51 धावा केल्या. दरम्यान, भारतानं इंग्लंडसमोर षटकात 8 विकेट्स गमावून धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि ख्रिस जॉर्डनला प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाल्या. तर, रीस टोपले, मॅथ्यू पार्किन्सन आणि टायमल मिल्स यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन:
जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार, यष्टीरक्षक), डेविड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, रीस टोपले, मॅथ्यू पार्किन्सन.
हे देखील वाचा-
- Arshdeep Singh: अखेर अर्शदीप सिंहची भारतीय टी-20 संघात एन्ट्री! इंग्लंडच्या फलंदाजांचं कंबरडं मोडण्यासाठी सज्ज
- ENG vs IND 1st T20: अर्शदीप सिंहचं पदार्पण! इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 मध्ये कोणकोणत्या खेळाडूंना मिळाली संधी?
- ENG vs IND T20 Series: टी-20 विश्वचषकात विराट खेळणार की नाही? इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेनंतर ठरणार!