(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs England Test: इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत 'हे' विक्रम होण्याची शक्यता, विराटवर असणार लक्ष
इंग्लंडविरुद्धची ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असेल आणि म्हणूनच ही मालिका दोन्ही देशांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. या मालिकेत कोणते मोठी विक्रम होऊ शकतात किंवा मोडली जाऊ शकतात, यावर एक नजर टाकूया.
India VS England : भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या कसोटी मालिकेचा पहिला सामना फेब्रुवारीपासून चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. इंग्लंडविरुद्धची ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा एक भाग असेल आणि म्हणूनच ही मालिका दोन्ही देशांसाठी खूप महत्वाची ठरणार आहे. या मालिकेत कोणते मोठी विक्रम होऊ शकतात किंवा मोडली जाऊ शकतात, यावर एक नजर टाकूया.
1. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध 19 कसोटी सामन्यात 49.06 च्या सरासरीने 1570 धावा केल्या आहेत. विराटने चार सामन्यांच्या या मालिकेत 470 धावा करून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा केल्या तर असं करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज बनू शकतो. यापूर्वी 2016-17 मध्ये जेव्हा इंग्लंडने भारत दौरा केला तेव्हा कोहलीने त्या चार सामन्यांच्या मालिकेत 600 पेक्षा अधिक धावा केल्या.
2. सुनील गावस्करने इंग्लंडविरुद्ध भारताकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंड संघाविरूद्ध एकूण 14 सामन्यात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचबरोबर कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या दहा कसोटी सामन्यांमध्ये भारताची कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे या मालिकेत तो सुनील गावस्कर यांच्या या विक्रमाशी बरोबरी करु शकेल.
विराट पुन्हा कर्णधारपदी येताच अजिंक्य रहाणेची लक्षवेधी प्रतिक्रिया
3. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने भारताविरुद्ध 16 कसोटीत 56.84 च्या सरासरीने 1421 धावा केल्या आहेत. जर रूटने भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत 305 धावा केल्या तर तो भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा इंग्लिश क्रिकेटपटू होईल. अखेरच्या भारत दौर्यावर रूटने 400 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने एक शतकही झळकावलं होतं.
4. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमधील 156 सामन्यांत 600 विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या मालिकेत 20 विकेट्स घेतल्या तर तो मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्ननंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणार तिसरा गोलंदाज ठरु शकतो. सध्या भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेने 619 विकेट घेतले आहेत.
संबंधित बातम्या
- Ind vs Eng | भारतात आल्यानंतर इंग्लंडचा संघ क्वॉरंटाईन; प्रॅक्टिससाठी केवळ 3 दिवस
- IND Vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत 'या' भारतीय गोलंदाजाला मिळू शकते संधी
- IND Vs ENG: इंग्लंडचे फिरकीपटू भारतीय खेळपट्टीवर चालणार नाहीत, माजी क्रिकेटरचा दावा
- IND vs ENG: अहमदाबादमध्ये इंग्लंडकडून भारत कधीच हरला नाही, आकडेवारी जाणून घ्या
- IND vs ENG | 107 वर्षांनी इंग्लंडनं परदेशात जिंकल्या सलग 5 कसोटी मालिका; टीम इंडिया विजयी घौडदौड रोखणार?