एक्स्प्लोर

विराट पुन्हा कर्णधारपदी येताच अजिंक्य रहाणेची लक्षवेधी प्रतिक्रिया

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या, अजिंक्य रहाणे यांनं क्रीडारसिकांसमवेत क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांचंही मन जिंकलं.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचं ऑस्ट्रेलियामध्ये नेतृत्त्वं करत अतिशय महत्त्वाच्या अशा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी संघाला विजयी मार्गावर नेणाऱ्या आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या, अजिंक्य रहाणे यांनं क्रीडारसिकांसमवेत क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांचंही मन जिंकलं. त्याच्या संयमी नेतृत्त्वाची ठिकठिकाणी प्रशंसा झाली. पण, आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाची धुरा सुट्टीहून परतणाऱ्या विराट कोहलीच्याच हाती असणार आहे. त्यामुळं यावर अजिंक्यची काय प्रतिक्रिया असेल, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत होता. याचं उत्तर खुद्द अजिंक्यनंच दिलं आहे.

'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना अजिंक्यनं निर्विवादपणे विराटच संघाचा कर्णधार असून आपण जेव्हा गरज असेल तेव्हा संघाचं नेतृत्त्वं करण्यासाठी आहोतच अशी लक्षवेधी आणि मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली. अजिंक्य रहाणेवर पुन्हा एकदा संघाच्या उपकर्णधारपदाची जबबादारी असेल तर, इंग्लंडसोबतच्या मालिकेसाठी भारतीय संघाचं कर्णधारपद पुन्हा एकदा विराट कोहली भूषवेल. याचबाबत प्रतिक्रिया देत अजिंक्यनं त्याची बाजू स्पष्ट केली आहे.

Farmers Protest | बळाचा वापर करुन आंदोलन चिरडल्यास गंभीर परिणाम- शरद पवार

काय म्हणाला अजिंक्य?

'काहीही बदलेलं नाही. विराट यापुर्वी आणि यापुढंही कसोटी संघाचा कर्णधार असेल आणि मी उपकर्णधार. त्याच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्वं करणं हे माझं कामच होतं आणि संघाच्या विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करणं ही माझी जबाबदारी होती', असं अजिंक्य म्हणाला. इथं कर्णधारपद महत्त्वाचं नसून, त्या पदाला साजेशी कामगिरी तुम्ही नेमकी कशा प्रकारे बजावता हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत मी यशस्वी ठरलो, आशा करतो की यापुढंही हे चित्र असंच राहील. माझ्या संघासाठी अशाच प्रकारची कामगिरी करण्याचा माझा मानस असेल, हे अजिंक्यनं स्पष्ट केलं.

विराटसोबतचं नातं नेमकं कसं?

विराट आणि माझं नातं नेहमीच चांगलं राहिलं आहे. आम्ही दोघांनीही एकत्र अशा अनेक स्मरणीय खेळी संघासाठी खेळल्या आहेत, असं म्हणत अजिंक्यनं विराटसोबचं नातं सर्वांपुढे ठेवलं.

कर्णधार म्हणून विराट कोहलीबाबत काय वाटतं?

विराटच्या कर्णधारपदामध्ये अनेक बारकावे असून, प्रत्येकासाठी त्याच्या परिभाषा वेगळ्या आहेत. अजिंक्यनंही विराट एका कर्णधाराच्या रुपात नेमका कसा आहे, या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'तो एक अतिशय तीक्ष्ण वृत्तीचा कर्णधार आहे. मैदानात तो प्रशंसनीय निर्णय घेतो. त्याला माझ्याकडूनही फार अपेक्षा आहेत आणि मी आशा करतो की त्याचा अपेक्षाभंग कधीच होऊ देणार नाही', असं अजिंक्य म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget