एक्स्प्लोर

IND vs ENG | 107 वर्षांनी इंग्लंडनं परदेशात जिंकल्या सलग 5 कसोटी मालिका; टीम इंडिया विजयी घौडदौड रोखणार?

IND vs ENG : श्रीलंका दौऱ्यानंतर आता टीम इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. तसेच टीम इग्लंड भारताविरोधात चेन्नईमध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे.

IND vs ENG : इंग्लंड क्रिकेट टीमने 107 वर्षांनी पहिल्यांदा परदेशी धरतीवर सलग पाच कसोटी सामने जिंकले आहेत. इंग्लंडने काही दिवसांपूर्वी गॉल इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा सहा विकेट्सनी पराभव केला. इंग्लंडने ही मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली. यापूर्वी इंग्लंडने परदेशात सलग पाच किंवा त्याहून अधिक कसोटी सामने 1911 पासून 1914 दरम्यान जिंकले होते.

इंग्लंडने श्रीलंकेच्याच मायभूमीवर त्यांना पराभूत करत 2-0 अशा फरकाने मालिका खिशात घातली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत सलग तीन कसोटी सामने जिंकत मालिका इंग्लंडने आपल्या नावे केली होती. केपटाऊनमध्ये पहिला कसोटी सामना 189 धावांनी, पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळवण्यात आलेला दुसरा कसोटी सामना 53 धावांनी, तर जोहान्सबर्गमधील तिसरा कसोटी सामना 191 धावांनी जिंकला होता.

त्यानंतर इंग्लंडने श्रीलंकेला पहिला कसोटी सामन्यात सात विकेट्सनी आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात सहा विकेट्सनी मात दिली आहे. इंग्लंडने यापूर्वी 107 वर्षांपूर्वी, परदेशात सलग सात कसोटी सामने जिंकले होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत तीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये डिसेंबर 1911 आणि जानेवारी 1914 मध्ये चार कसोटी सामने जिंकले होते.

India vs England 2021 Test Schedule: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात, पाहा संपूर्ण टाईमटेबल

टीम इंडिया इंग्लंडची विजयी घौडदौड रोखणार?

श्रीलंकेनंतर आता इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. तसेच टीम इग्लंड भारताविरोधात चेन्नईमध्ये चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळणार आहे. अशातच इंग्लंडची नजर परदेशात आपली सलग सहावी कसोटी मालिका जिंकण्यावर असेल, तर टीम इंडिया इंग्लंडची विजयी घौडदौड रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना चेन्नईतील एम. ए. चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळवण्यात येईल. या मैदानावर इंग्लंडच्या विरोधात भारताने अनेक रेकॉर्ड केले आहेत.

आठ वर्षांपूर्वी भारत मायभूमीतच इंग्लंडकडून पराभूत

टीम इंग्लंड डिसेंबर 2016 मध्ये भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-4 अशी मालिका जिंकत भारताला स्वतःच्याच मायभूमीत पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, 2012-13 मध्येही इंग्लंडने एलिस्टर कुकच्या नेतृत्त्वात भारताला पराभूत केलं आहे. त्यावेळी इंग्लंडने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली होती.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Shubman Gill : गोलंदाजांवर अन्याय किती दिवस? पहिला कसोटी सामना अनिर्णित, शुभमन गिल ICCवर संतापला, सलाइवा बंदी उठवण्याची केली मागणी! नेमकं काय म्हणाला?
गोलंदाजांवर अन्याय किती दिवस? पहिला कसोटी सामना अनिर्णित, शुभमन गिल ICCवर संतापला, सलाइवा बंदी उठवण्याची केली मागणी! नेमकं काय म्हणाला?
Harshit Rana Controversy IND vs PAK : स्वत: शून्यावर बाद, बॉलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
स्वत: शून्यावर बाद, बॉलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
IND vs NZ 1st Test Match Drawn : न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?
न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Embed widget