(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs England 2021 Test Schedule: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात, पाहा संपूर्ण टाईमटेबल
कसोटी मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईत खेळले जाणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया 27 जानेवारीला चेन्नईला पोहोचणार आहे.
INDvsENG : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजयानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका कधी सुरु होणार याकडे क्रिकेट प्रेमींच लक्ष आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. एकूण चार कसोटी सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळले जातील.
सामन्यादरम्यान मैदानात प्रेक्षक उपस्थित नसतील. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. मालिकेचे पहिले दोन सामने चेन्नईत खेळले जाणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया 27 जानेवारीला चेन्नईला पोहोचणार आहे. चेन्नईला पोहोचल्यानंतर खेळाडूंना क्वॉरंटाईन व्हावं लागणार आहे. टीम इंडियाने याबाबत विशेष योजना आखली आहे. भारतीय संघ इंग्लंडला कमी लेखणार नाही आणि ऑस्ट्रेलियासारख्या चांगल्या रणनीतीवर काम करेल.
IND Vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांत 'या' भारतीय गोलंदाजाला मिळू शकते संधी
कसोटी मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात
- पहिला सामना: 5 फेब्रवारी ते 9 फेब्रुवारी (चेन्नई)
- दुसरा सामना: 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी (चेन्नई)
- तिसरा सामना: 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी (अहमदाबाद)
- चौथा सामना: 4 मार्च ते 8 मार्च (अहमदाबाद)
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. यात विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रिद्धिमान साहा, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे.