Pimpri Chinchwad: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजित पवारांसोबत लढणं शक्य नाही', अजितदादांनी 24 तासात पिंपरीत भाजप-शिंदे गटाचे नगरसेवकपदाचे 4 उमेदवार फोडले
Pimpri Chinchwad: शहरातील भाजपच्या तीन आणि शिंदे शिवसेनेचा एक अशा चार माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश करुन घेत, अजित पवारांनी महायुतीच्या घटक पक्षांना पहिला धक्का दिला.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची अजित पवारांसोबत (Mahayuti) मैत्रीपूर्ण लढाई होईल, कोणतीही कटुता निर्माण केली जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना असं म्हणून चोवीस तास उलटायच्या आतचं अजित पवारांनी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महायुतीत कटुता निर्माण होण्याच्या दृष्टीने पावलं टाकली. शहरातील भाजपच्या तीन आणि शिंदे शिवसेनेचा एक अशा चार माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश करुन घेत, अजित पवारांनी महायुतीच्या घटक पक्षांना पहिला धक्का दिला. (Pimpri Chinchwad)
बरं इथंच न थांबता अर्ज भरण्यापूर्वी भाजप आणि शिंदे शिवसेनेतील आणखी सात ते आठ इच्छुकांच्या हाती अजित पवार घड्याळ बांधणार आहेत, असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे. महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही, असं ठरलंय, खरं मात्र प्रत्यक्षात अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी महायुतीत कटुता निर्माण होणार नाही असं म्हटलं असलं तरी अजित पवारांच्या या कृतीनं महायुतीत गोडवा टिकून राहील का? याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. मात्र भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत ज्यांना असुरक्षित वाटतंय अशा इच्छुकांनी स्वतःहून राष्ट्रवादीत प्रवेश केलेत, त्यामुळं महायुतीत कटुता निर्माण होणार नाही, असा दावा बहल यांनी केलाय. (Pimpri Chinchwad)
NCP Ajit Pawar: सांगलीतही माजी महापौर नगरसेवकांसह 15 जण रात्रीच अजितदादांना भेटले
सांगली मिरज आणि कुपवाडमधील माजी महापौरांसह पंधरा जण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाच्या वाटेवर असल्याचं चित्र दिसून येत आहे. या सर्वांनी काल (सोमवारी, ता १५) रात्री पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची घेतली भेट घेतली आहे. लवकरच या माजी नगरसेवकाचा पक्षप्रवेश होणार आहे. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी (शपा) पक्षाशी संबंधित सर्व माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर आली आहे.(municipal elections)
सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील पंधराहून अधिक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांची रात्री पुण्यात भेट घेतली आहे. या भेटीत पक्षप्रवेशावर चर्चा झाली असून लवकरच मिरजेत अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकाचा राष्ट्रवादी काँग्रसमध्ये पक्षप्रवेश देखील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अजित पवार यांच्या भेटीला गेलेले हे सर्व माजी नगरसेवक भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या माजी महापौरासह दिग्गज नगरसेवकांचा समावेश आहे. यामुळे मिरज शहरात खासदार विशाल पाटील,आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपलाही धक्का बसला आहे. (Ajit Pawar)





















