IND A vs SA A 1st ODI : भारतीय गोलंदाजांचा रौद्र अवतार; 3 ओव्हर्समध्ये 3 धावांवर 3 विकेट्स, दक्षिण आफ्रिका हैराण, टॉप ऑर्डर साफ
India A vs South Africa A 1st Unofficial ODI Marathi News : भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील तीन अनौपचारिक वनडे सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना सुरू झाला आहे.

India A vs South Africa A, 1st Unofficial ODI : राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यातील तीन अनौपचारिक वनडे सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारत अचा कर्णधार तिलक वर्मा आहे. दक्षिण आफ्रिका अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली.
शुन्यावर दोन विकेट्स...
अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीसमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी धावफलकावर एकही धाव न करता दोन विकेट्स गमावल्या. रुबिन हरमनला अर्शदीपने तिलक वर्माच्या झेलावर शून्यावर बाद केले, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेला जॉर्डन हरमनही धाव न करता रनआऊट झाला. त्यामुळे आफ्रिकेचा डाव पहिल्याच षटकात 0/2 अशा अवस्थेत कोसळला. भारत अ संघाच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात करत सामना आपल्या पकडीत आणण्याचे संकेत दिले आहेत.
Score update of india a vs South Africa A.
— Abhishek Kumar (@Abhishek060722) November 13, 2025
South Africa are 3 for 3 wickets in 2.3 overs. pic.twitter.com/qyRNUPrXb8
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पण ठरला फेल...
दक्षिण आफ्रिकेने कर्णधार मार्क्स अॅकरमनच्या रूपात तिसरी विकेट गमावली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोही आपले खाते उघडू शकला नाही. त्यांचा तिसरा विकेट फक्त एका धावेवर पडला. त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद केले. संघाने 3 षटकांत 3 धावांत 3 विकेट गमावल्या आहेत.
भारत अ संघाने शेवटचा एकदिवसीय सामना जिंकला
भारत अ संघाने सप्टेंबर 2019 मध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. भारत अ संघाने 36 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात श्रेयस अय्यरने भारत अ संघाचे नेतृत्व केले होते. दक्षिण आफ्रिका अ संघाचे नेतृत्व टेम्बा बावुमा यांनी केले होते.
टीम इंडिया अ संघाची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, तिलक वर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, निशांत सिंधू, हर्षित राणा, विपराज निगम, अर्शदीप सिंग, प्रसीद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका अ संघाची प्लेइंग इलेव्हन
रिवाल्डो मूनसामी, रुबिन हर्मन (यष्टीरक्षक), जॉर्डन हर्मन, मार्कस अकरमन (कर्णधार), सिनेथेम्बा केशिले, डायन फॉरेस्टर, डेलानो पॉटगीटर, ब्योर्न फोर्टुइन, टियान व्हॅन वुरेन, त्शेपो मोरेकी, ओथनील बार्टमन.
हे ही वाचा -





















