एक्स्प्लोर

IND vs WI 2nd Test Match : वेस्ट इंडिजकडून दमदार प्रत्युत्तर, भारताकडे अद्याप 352 धावांची आघाडी

IND vs WI 2nd Test Match : पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने 438 धावांपर्यंत मजल मारली.

IND vs WI 2nd Test Match : पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताने 438 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरदाखल वेस्ट इंडिजनेही दमदार सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने एक बाद 86 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट याने दमदार फलंदाजी केली. भारताकडे अद्याप ३५२ धावांची आघाडी आहे. दुसरा दिवस भारताकडून विराट कोहली, रविंद्र जाडेजा आणि अश्विन यांनी गाजवला. विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. तर अश्विन आणि जाडेजा यांनी अर्धशतके ठोकली.

वेस्ट इंडिजचे सलामी फलंदाज क्रेग ब्रेथवेट आणि टी चंद्रपॉल यांनी संयमी आणि अश्वासक सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. रविंद्र जाडेजा याने चंद्रपॉल याला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट ३७ खेळत होता. या खेळीत त्याने तीन चौकार लगावले. तर चंद्रपॉल याने चार चौकाराच्या मदतीने ३३ धावांचे योगदान दिले. kirk mckenzie १४ धावांवर नाबाद आहे, त्याने या छोटेखानी खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकार लगावला. 

 दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 438 धावांपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने आपल्या ५०० वे आंतरराष्ट्रीय सामन्यात शतकाला गवसणी घातली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात हा १०० वा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने दमदार शतक झळकावले. त्याशिवाय कर्णधार रोहित शर्मा, सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल, अष्टपैलू रविंद्र जाडेजा आणि आर. अश्विन यांनी अर्धशतके ठोकली. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी संयमी फलंदाजी केली. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर दोघांनीही धावा काढण्यास सुरुवात केली. विराट कोहलीने पहिल्यांदा शतक झळकावले, त्यानंतर रविंद्र जाडेजाने अर्धशतक ठोकले. पण त्यानंतर लागोपाठ भारताच्या विकेट पडल्या. विराट कोहलीने १२१ धावांची खेळी केली. तर रविंद्र जाडेजाने ६१ धावांचे योगदान दिले. 

विराट कोहलीने २०६ चेंडूत १२१ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार लगावले. तर रविंद्र जाडेजा याने १५२ चेंडूत पाच चौकाराच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी पाचव्या विकेटसाठी दीडशतकी भागिदारी केली. रविंद्र जाडेजा आणि गिल झटपट बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा यांनी डावाला आकार दिला. 

रविंद्र जाडेजा आणि विराट कोहली एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यानंतर इशान किशन आणि आर. अश्विन यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण इशान किशन २५ धावा काढून बाद झाला. इशान किशन याने चार चौकाराच्या मदतीने ३७ चेंडूत २५ धावांची खेळी केली.

इशान किशन बाद झाल्यानंतर उनाडकटही फार काळ टिकला नाही. उनाडकट सात धावा काढून तंबूत परतला. मोहम्मद सिरजला खातेही उघडता आले नाही. अश्विन याने तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत भारताची धावसंख्या वाढवली. अश्विन याने अखेरीस फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. अश्विन याने ७८ चेंडूत आठ चौकाराच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजकडून केमर रोज आणि जोमल वॉरिकन यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. तर जेसन होल्डर याने दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 February 2025Special Report Ujjwal Nikam | निकमांकडे वकीलपत्र, तरीही आरोपांचं सत्र;नियुक्तीवर देशमुख कुटुंब समाधानीSpecial Report | Uddhav Thackeray | ठाकरेंकडून शिंदेंना शिंगावर, फडणवीसांना डोक्यावर?Zero Hour | Swarget Bus Depo News | 'शिवशाही'त बलात्कार एसटीचं 'वस्रहरण',झीरो अवर शोमध्ये सखोल चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maha Shivratri : कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
कित्येक वर्ष जुनं मंदिर, अन् पूजेचा तामझाम, पाकिस्तानातील खास महाशिवरात्र! पाहा Exclusive फोटो
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या नृत्यांगणा; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
Embed widget