IND vs SA : संजूनं जीव ओतला, पण अखेर झुंज व्यर्थ, भारताचा 11 धावांनी पराभव, दक्षिण आफ्रिकेची मालिकेत 1-0 ने आघाडी
IND vs AUS, 1st ODI, Ekana Sports City: : संजू सॅमसननं अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. पण त्याला हवी तशी साथ मिळाली नाही आणि 9 धावांनी भारताला सामना गमवावा लागला.
IND vs SA, 1st ODI, Ekana Sports City : झुंज काय असते, हे आज संजू सॅमसननं दाखवून दिलं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना भारताने 9 धावांनी गमावला, पण संजूनं मात्र सर्वांचीच मनं जिंकली. संजूनं नाबाद 86 धावांची एकहाती झुंज दिली. पण योग्यवेळी त्याला योग्य साथ मिळाली नाही आणि अवघ्या 9 धावांनी भारताने सामना गमावला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी संघासाठी 40 षटकांचा केला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 249 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताला विजयासाठी 250 धावा करायच्या होत्या. पण भारत 40 षटकांत 240 धावाच करु शकला आणि भारताने सामना 9 धावांनी गमावला.
सर्वात आधी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. सुरुवातीला भारताने चांगली गोलंदाजी केली. शार्दूलने दमदार अशा विकेट्स सुरुवातीला घेतल्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या डी कॉकने 48 धावांची चांगली खेळी केली. तो बाद झाल्यावर पुन्हा संघ अडचणीत येईल असे वाटत होते. पण हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर या दोघांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी अनुक्रमे नाबाद 74 आणि नाबाद 75 धावा करत 249 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताला विजयासाठी 250 धावा 40 षटकात करायच्या आहेत. भारताकडून शार्दूल ठाकूरने 2 तर रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अय्यर-संजूची झुंज व्यर्थ
250 धावा 40 षटकांत कऱण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली.सलामीवीर शुभमन गिल 3 तर शिखर धवन 4 धावा करुन बाद झाले. ऋतुराज आणि ईशानने प्रत्येकी 19 आणि 20 रन केले. पण ते दोघेही बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 50 रन करुन तोही आऊट झाला. दुसऱ्या बाजूने संजूने डाव सावरला होता. शार्दूलनेही 33 धावांची महत्त्वपूर्ण साथ संजूला दिली. पण शार्दूल बाद झाल्यानंतर शेवटच्या फळीतील फलंदाज पटपट बाद होत गेले. अगदी अखेरच्या षटकापर्यंत थरार पोहोचला. 19 व्या षटकातील अखेरचा नो बॉल भारतासाठी फायदेशीर ठरला, आणि भारत अखेरच्या षटकातही सामना जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या. अखेरच्या षटकात 30 धावांची गरज असताना संजूने तीन चौकार आणि एक षटकार ठोकला पण अखेर चेंडू शिल्लक राहिले नाहीत आणि भारत 40 षटकांत 240 धावांच करु शकल्याने सामना 9 धावांनी भारताने गमावला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेतही 1-0 ची आघाडी घेतली आहे.
हे देखील वाचा-